Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

बस वाहकाचीच युवतीला शिवीगाळ, मराठी भाषिकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप

    बेळगाव : कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस? असे बस प्रवासावेळी विचारत युवतीला शिवीगाळ करणाऱ्या परिवहन बस वाहकाला नागरिकांनी धारेवर धरल्याची घटना बाळेकुंद्री खुर्द येथील बस थांबल्यावर घडली; पण बसवाहकाने याला भाषिक वादाचा रंग चढवत ‘मराठीत का बोलत नाहीस?’ म्हणून मराठी भाषकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला …

Read More »

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी तातडीने आणि गांभीर्याने हालचाली कराव्यात

  महाराष्ट्र एकरण समितीच्या शिष्टमंडळाचे शरद पवारांना साकडे नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत.सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीला आले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात

  बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समिती नेते श्री. आर. एम.चौगुले, श्री.मदन बामने, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री.रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष श्री.अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यासह …

Read More »

केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन समारंभ

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या समारंभात विशिष्ट पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमामुळे समर्पित डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, १०० बाल कर्करोग रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय धैर्य, आशा आणि लवचिकता साजरी करण्यासाठी एकत्र आले. या धाडसी तरुण योद्ध्यांसोबत …

Read More »

शिवरायांचा आदर्श ठेवून कार्यरत रहा : माजी आमदार राजेश पाटील

  बिजगर्णी : शिवचरित्र वाचा. इतिहास जाणून घ्या. गडकिल्ले अनुभवा. हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. इतर धर्माचा राजांनी द्रोह केला नाही उलट स्त्रीशक्ती चा सन्मान केला. स्वबळावर रयतेचे राजे झाले. अठरा पगड जातीला सामावून घेऊन राज्य उभारले हा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनानी इतिहास समजून घ्यावा सीमाभागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धनासाठी या महाविद्यालयाची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये‌ छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषय शिक्षक विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी इयत्ता दुसरी ‘क’च्या वर्गशिक्षिका शैला पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, उस्मान शेख यांच्या भूमिकेत विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी …

Read More »

खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…

  बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …

Read More »

मराठी साहित्य संमेलनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीला रवाना

  बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या गळचेपी धोरणाबद्दल मांडल्या भाषिक अल्पसंख्यांक सहायक आयुक्तांकडे तक्रारी

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तसेच महिला आघाडी यांच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहायक आयुक्त शिवकुमार यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक गळचेपीबद्दल तक्रारी मांडल्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक बोलवण्यात आली होती यावेळी समितीच्या नेत्यांनी मराठी मधून उतारे, सरकारी कागदपत्रे, …

Read More »

समितीचे नेते व सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांचे निधन

  खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, …

Read More »