Sunday , July 26 2026
Breaking News

1 जून हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; येळ्ळूर विभाग समितीच्या वतीने आवाहन….

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 26/05/2025 रोजी सायंकाळी 7.30 वा. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी 1 जून रोजी कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन येळ्ळूर विभाग समिती पदाधिकारी, आजी माजी, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, तसेच आजी माजी ग्राम पंचायत सदस्य-सदस्या, गावातील निष्ठावंत नेते कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी श्री. विलास ना घाडी अध्यक्ष येळ्ळूर विभाग म. ए. समिती, सचिव राजू उघाडे, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, उपाध्यक्ष मनोहर अ पाटील, शांताराम कुगजी, ग्राम पंचायत सदस्य परशराम परिट,शिवाजी नांदूरकर, तानाजी पाटील, चेतन हुंदरे, निखिल पाटील, यल्लप्पा बिर्जे, मल्लापा काकतीकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *