Sunday , March 8 2026
Breaking News

बेळगाव

गणेशपूर येथे क्षुल्लक कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला

  बेळगाव : गणेशपूर येथे क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले. प्रवीण पादके नामक व्यक्ती आज सकाळी गणेशपूर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका बेकरीतून ब्रेड आणण्यासाठी गेला होती. यावेळी बेकरीशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पार्किंगच्या …

Read More »

बस-कार अपघात : बेळगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू

  दावणगेरे : दावणगेरे येथे बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसवराजप्पा (38), श्रीधर (32), विजय …

Read More »

कलबुर्गी येथे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बसची धडक : पाच ठार

  कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ शनिवारी पहाटे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बस धडकल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात वाजीद, मेहबूबी, प्रियांका आणि मेहबूब यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृत सर्व नवनगर ता. बागलकोट येथील रहिवासी होते. कलबुर्गी येथील खाजा बंदेनवाज दर्ग्यात जात असताना सदर …

Read More »

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक खेळीमेळीत…

  सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार बेळगाव : मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक आज बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला. एप्रिल महिन्यातील बैठक समृद्धी काॅलनी अनगोळ वडगाव रोड चौथा क्राॅस येथे देवकी माळी यांच्या निवासस्थानी पार …

Read More »

राज्यपालांच्या नावावरील जमिनीचा गैरव्यवहार : भीमप्पा गडाद यांचा आरोप

  बेळगाव : बेळगावमध्ये राज्यपालांच्या नावावर असलेल्या ६ एकर सरकारी जमिनीला खासगी व्यक्तीच्या नावावर पोटभाड्याने देण्यात आल्याने सरकारला तब्बल १० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते …

Read More »

श्रीरामनवमीनिमित्त बेळगाव शहरात 6 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन

  बेळगाव : श्रीरामनवमी निमित्त बेळगाव शहरात 6 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शहापूर या मार्गावर ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेचा जागर करणाऱ्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने माजी नगरसेवकांच्या वतीने अभिवादन

  बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आज 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने माजी नगरसेवकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 4 एप्रिल 2000 सालि तत्कालीन महापौर व माजी आमदार संभाजीराव पाटील व तत्कालीन नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका सभागृहात एकमताने ठराव संमत करून धर्मवीर संभाजी चौक …

Read More »

किरकोळ कारणावरून कणबर्गीत वकीलाला मारहाण

  बेळगाव : गाडी आडवी लावण्याचे कारण विचारल्यामुळे वकिलाला मारहाण केल्याची घटना कणबर्गी परिसरात घडली. या घटनेत वकील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगावच्या कणबर्गी येथे वकील राहुल ट्यानगी हे आपल्या नातेवाईकांसमवेत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गाडी आडवी घातल्याचे निमित्त साधून संशयितांनी वटारून पाहिल्याने …

Read More »

समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात : प्रा. मधुकर पाटील यांचे प्रतिपादन

  फौंडेशनच्या वतीने संस्थापक वाय. एन. मजुकर यांचा ८२ वा वाढदिवस उत्साहात साजरा बेळगाव : समाजामध्ये मुल्यात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात कारण म. फुले, राजाराम मोहनराय, कर्मवीर भाऊराव पाटील, या लोकांनी ज्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये जीवनामध्ये बदल घडवून आणला. ती प्रेरणा आजच्या शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. साने गुरुजीं सारखा …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेची वेटलिफ्टर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

  बेळगाव : आदिती शंकर पाटील राहणार कंग्राळी बी.के. ही विद्यार्थिनी सध्या मराठी विद्यानिकेतन शाळेत इयत्ता दहावी या वर्गात शिकत आहे. मंगळूर या ठिकाणी झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती शंकर पाटील यांनी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत 17वर्षाखालील स्कूल गेम्स …

Read More »