Sunday , July 26 2026
Breaking News

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक खेळीमेळीत…

Spread the love

 

सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार

बेळगाव : मिरज माहेर मंडळाची मासिक बैठक आज बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व लोक सेवा फौंडेशनचे प्रमुख विरेश हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला.
एप्रिल महिन्यातील बैठक समृद्धी काॅलनी अनगोळ वडगाव रोड चौथा क्राॅस येथे देवकी माळी यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी अतिथी म्हणून सर्व लोक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मिरज माहेर मंडळाच्या अध्यक्ष्या अस्मिता आळतेकर, सेक्रेटरी – दिपा बापट, खजिनदार- सुखद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. लग्न होऊन सासरी बेळगावला आलेल्या मिरज माहेरवाशीणींसाठी खास माहेरचा जिव्हाळा लाभावा या दृष्टीकोनातून काही बेळगावच्या हौशी मिरज माहेरवाशीणींनी हौसेखातर मिरज माहेर मंडळाची स्थापना 1990 साली केली गेली. आता या मंडळाला 34 वर्षे पुर्ण होऊन त्या ईवल्याश्या रोपट्याचे आता डेरेदार वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हे मंडळ समाजकार्यातही अग्रेसर आहे. प्रत्येक महिन्यात छोटे मोठे उपक्रम राबवत असते. देवकी माळी, स्मिता सरवीर, अस्मिता आळतेकर, दिपा बापट, सुखद देशपांडे, लता सुर्यवंशी, शरयू वाघ, योगिता हिरेमठ, योगिता हुंचनट्टी, सीमा मुरकुटे, सीमा परांजपे, प्रतिभा राजमाने, शोभा लोकूर, अंजली बेडेकर आदी सदस्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *