बेळगाव : बेळगावातील अनगोळ चिदंबरनगरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने एका अज्ञात 60 वर्षीय व्यक्तीचा भीषण मृत्यू झाला. सुमारे 8-10 कुत्र्यांनी वृद्धावर हल्ला केला. कुत्र्यांनी या हल्ल्यात सदर वृद्धाचे कपडे देखील फाडून टाकले आणि त्या वृद्धाच्या शरीराचे लचके तोडले. या भागात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. …
Read More »सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सौ. सुनिता यल्लाप्पा उडकेकर यांचा सत्कार
येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात येतो. यावर्षीही सामाजिक कार्य करणाऱ्या, नेहमी शैक्षणिक कार्यात सहभागी असणाऱ्या नेताजी गल्ली, येळ्ळूर येथील सौ. सुनीता यल्लाप्पा उडकेकर यांचा शाळेच्या वतीने शाल …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना प्रेस क्लबचा विशेष पुरस्कार
बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांची बेंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांची बंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या पाच हमीपैकी सर्वात …
Read More »म. ए. युवा समिती सीमाभागची विस्तारित कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी दिनेश कदम यांची निवड बेळगाव : मागील आठवड्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग या सीमाभागातील युवकांच्या शिखर समितीची स्थापना हुतात्मा स्मारक परिसरात करण्यात येऊन अध्यक्षपदी शुभम शेळके, कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली, आज पुन्हा युवा समिती सीमाभागची बैठक हिंडलगा येथील …
Read More »सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
बेळगांव : शहरातील आंबेडकर उद्यान येथे भारत देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती विविध दलीत संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले, …
Read More »आनंदनगर नाल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळींना निवेदन सादर
बेळगाव : शहरातील आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथील नाला बांधकामावर रहिवाशांचा आक्षेप असून, त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले. मंत्र्यांनी निवेदन स्वीकारत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आनंदनगर येथे नाल्याचे बांधकाम सुरू आहे. …
Read More »मराठा मंडळ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त फार्मासी कॉलेजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
बेळगाव : येथील ‘मराठा मंडळ काँलेज आँफ फार्मासी, बेळगाव आणि ‘नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ या संस्थेच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त काँलेजमधील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर ३ जानेवारी रोजी आयोजित केले होते. या शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी नेत्र तपासणी …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती व राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या विज्ञान शिक्षिका सविता पवार उपस्थित होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले …
Read More »कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा उद्यापासून
बेळगाव : सलग दोन दिवस चालणारी एकांकिका स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे आजपासून सुरू होणार आहे. सलग 13व्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन कॅपिटल वन ही संस्था करीत आहे. बेळगाव शहराला लाभलेली नाट्यपरंपरेला गत वैभव प्राप्त करून देण्याच कार्य संस्था करत आहे. पारदर्शकता व निटनेटक्या आयोजनाचा जोरावर सदर स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय …
Read More »अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन काम पूर्ण झाल्यावरच : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : अनगोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटन समारंभाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, या उद्घाटनाला कोणत्याही प्रकारचा जातीय रंग देण्याची आवश्यकता नाही. काम पूर्ण झाल्यावर मूर्तीचे उद्घाटन होऊ शकते आणि त्यात जातीय वादांचा समावेश नाही. मंत्री सतीश जारकीहोळी आज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta