Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

सीमालढा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी पत्रकारांचे योगदान मोलाचे : मालोजी अष्टेकर

  युवा समितीच्यावतीने मराठी पत्रकारांचा सन्मान बेळगाव : गेली ६७ वर्ष सुरू असलेल्या सीमालढ्यात तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, …

Read More »

आयआयएचएम संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव

  बेळगाव : गोवा येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने बेळगावातील शैक्षणिक समूह संस्था प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ मंगळवारी पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच सहाय्यक शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

वडिलांचा संशयास्पद मृत्यू; मुलीने केली पोलिसात तक्रार

  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पद्मन्नावर यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी उमा यांच्यावर संशय असल्याचा गंभीर आरोप संतोष यांच्या मुलीने केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष पद्मन्नावर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत “वुमन ऑफ इम्पॅक्ट” पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : प्रसिद्ध डॉक्टर, समर्पित समाजसेविका आणि कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत यांना “वुमन ऑफ इम्पॅक्ट” हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना समाजसेवा श्रेणीतील सन्मानासाठी निवडण्यात आले. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील राष्ट्रीय शेअर बाजारात सदर पुरस्कार …

Read More »

येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेकडून शिवस्मारकाचा अहवाल ग्रामस्थांसमोर सादर

  येळ्ळूर : येळ्ळूरमध्ये हिंदवी स्वराज युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून 25 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते अश्वारूढ शिवमूर्तीचे लोकार्पण झाले होते. त्या खर्चाचा लेखाजोखा हिंदवी स्वराज युवा संघटनेकडून येळ्ळूर ग्रामस्थांसमोर विजयादशमीच्या निमित्ताने ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीच्या प्रांगणात सादर करण्यात आला. या …

Read More »

काळ्या दिनाच्या परवानगीबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : १ नोव्हेंबर काळा दिन पाळण्यास परवानगी मिळावी यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीत काळा दिन करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टपणे सांगितले. माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. १५ …

Read More »

चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या फर्निचर व्यावसायिकांना शुभेच्छा

  बेळगाव : चारधाम यात्रेसाठी बेळगाव शहरातील फर्निचर व्यावसायिक नारायण पाटील, कल्लाप्पा सक्रोजी आणि तानाजी सुतार हे आज रवाना झाले त्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील खानापूर रोडवरील अमर फर्निचर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमर फर्निचरचे मालक यल्लाप्पा अकनोजी हे …

Read More »

पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी

  बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु असून या आंदोलनाला सरकार म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत पंचमसाली समाजाची आरक्षणाच्या विषयावर बैठक होणार होती, मात्र बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कोणतेच संकेत मिळाले नाहीत. यामुळे १८ ऑक्टोबर रोजी पंचमसाली समाजाच्या …

Read More »

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या

  बेळगाव : शहापूर येथील सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील लोकमान्य रंगमंदिर …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली) येथील स्वामी विवेकानंद स्मारकात वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ येत्या बुधवार दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात येणार असून …

Read More »