बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला रविवार दि. 22 रोजी प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा …
Read More »सेंट झेवियर्स मुलींच्या फुटबॉल संघाला अजिंक्यपद
बेळगाव : विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय प्राथमिक आंतरशालेय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स मुलींच्या फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी जिल्हा संघावर 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात …
Read More »सोसायटीची वार्षिक उलाढाल 55 कोटीच्या वर : चेअरमन डी. जी. पाटील
नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …
Read More »सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या नागरी सेवकांनी सोमवारी हाताला काळ्या फिती बांधून व सफाई कामगार दिनावर बहिष्कार टाकून, कायमस्वरूपी भरती करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. दीड वर्षापूर्वी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना …
Read More »रुक्मिणी नगर आणि उज्वल नगर येथील तरुणांमध्ये तलवारीने हाणामारी; चार जण जखमी
बेळगाव : बेळगावातील रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये काल रात्री ईद मिलाद मिरवणुकीनंतर क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर तलवारी घेऊन हाणामारीत झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, ईद मिलादची मिरवणूक सुरू असताना रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. पण मिरवणूक आटोपून परतत …
Read More »बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी राबवले स्वच्छता अभियान
बेळगाव : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बेनकनहळी, सावगाव, गणेशपुर, नानावाडी, मंडोळी, हंगरगा, सुरेश अंगडी रोड बोकमुर, बेळगुंदी परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन सावगाव तलावात करण्यात येते. तलाव व परिसरात खूप ठिकाणी व पाण्यामधे प्लास्टिक व निर्माल्य पसरलेले होते म्हणून बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी पुढाकार घेऊन या …
Read More »उदयोन्मुख धावपटू प्रेम बुरुडचा नागरी सन्मान सोहळा संपन्न
बेळगाव : कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याचा गावात नागरी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयचे अध्यक्ष वाय. पी. नाईक उपस्थित होते. प्रारंभी ऍड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. गावातील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रम घेऊन गरीब परिस्थितीमध्ये धावपटू …
Read More »मातृभाषेवर प्रेम करा; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड
बेळगाव : “मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची, तुकारामांची, सावरकरांची, ज्ञानेश्वरांची आहे. त्यामुळे या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरातील ज्ञानवंत मातृभाषेचे महत्त्व सांगतात तसे ते आपल्या भाषेलाही आहे. त्यामुळे मराठी भाषेतून शिकणाऱ्यानी मनातला न्यूनगंड काढून टाकावा आणि या भाषेतही ज्या अनेक संधी उपलब्ध आहेत त्या स्वीकारून जीवनाच सोनं करावं” …
Read More »ज्योती कॉलेजला सांघिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक पदवी पूर्व शिक्षण विभाग बेळगाव व ज्योती कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांघिक स्पर्धेमध्ये ज्योती कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धा ज्योती कॉलेजच्या क्रीडांगणावर घेण्यात आल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत ज्योती कॉलेजच्या कबड्डी मुलांच्या संघाने अंतिम स्पर्धेत मराठा मंडळ पियू कॉलेज किनये यांच्यावर एकतर्फी …
Read More »हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात पूर्व वैमनस्यातून खून
बेळगाव : पूर्व वैमनस्यातून खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीला यमकनमर्डी पोलिसांनी अवघ्या 24 तासात शिताफीने अटक केल्याची माहिती एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली. सदर खून हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून विठ्ठल जोत्याप्पा रामगोनट्टी (वय 60) या व्यक्तीच्या अंगावर कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta