Sunday , July 26 2026
Breaking News

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेला नाट्यसंघांचा उत्तम प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : बेळगावकर नाट्यरसिक ज्या स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेस स्पर्धक संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सातत्याने गेली १२ वर्षे भव्य एकांकिका स्पर्धेप्रमाणेच यंदाच्या स्पर्धामध्ये देखील कर्नाटक, महाराष्ट्र, व गोवा येथील संघ आपल्या कलेचा आविष्कार बेळगांव नगरीत सादर करणार आहेत.
नवनवीन कलाकार लेखक दिग्दर्शक निर्माण व्हावेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात असलेल्या नाटय संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी व आपल्या परिसरातील नाट्य परंपरा जोपासता यावी हा यामागचा संस्थेचा मूळ उद्देश साध्य होताना दिसत आहे. स्पर्धक संघाकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे सदर स्पर्धा २ दिवस भरविण्यात येणार आहे.
एकंदरीत पाहता यंदाची स्पर्धा अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली असून छाननीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगांव येथे सदर स्पर्धेचे आयोजन केले.आहे.
दि. ०४ व ०५ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी १० पासून रात्री ९ या कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित रोज साधारण १० एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेचे काम युध्यपातळीवर सुरू असून या स्पर्धेतून नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकेच्या मालिकेची पर्वणी तर नवोदित कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार सादर करण्यासाठी रंगमंच उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्गज परीक्षकांना विविध शहरातून आमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांचा उपस्थितीत होणार आहे. बेळगांवकरांनी स्पर्धेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कॅपिटल वनचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी केले आहे.

प्रवेश विनामूल्य
ही स्पर्धा नाट्यरसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य असून सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत होणार असल्याने, ज्या नाट्य रसिकांना एवढा वेळ बसने शक्य नाही अशा रसिकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास यावे. पण प्रयोग सुरू असताना ये-जा करु नये व आपला मोबाईल silent mode वर ठेवावा स्पर्धेत अडथळा आणू नये व संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *