बेळगाव : कडोली येथील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम समाजातील तरुणाला फाशी द्यावी, अशी मागणी कडोलीच्या समस्त मुस्लिम समाजाने केली आहे. मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडोली येथील मुस्लीम बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कडोली गावातील …
Read More »युवकाच्या खून प्रकरणी सहा युवकांना जन्मठेप
बेळगाव : 2 वर्षांपूर्वी खासबाग येथे क्षुल्लक कारणातून युवकाचा खून केल्याप्रकरणी सहा युवकांना जन्मठेपेची शिक्षा चतुर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे. महेश ज्ञानेश्वर कामन्नाचे (वय 35, रा. तारीहाळ रोड, विजयनगर, हलगा) या तरुणाचा 13 मे 2022 रोजी खासबागमधील जुना पीबी रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर …
Read More »लक्ष्मण कंग्राळकर लिखित “हेचि माझे सुख” पुस्तकाचे बेळगावच्या सर्व ग्रंथालयांना वितरण
बेळगाव : माजी निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कंग्राळकर यांचे ‘हेचि माझे सुख” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी आपल्या या नवीन पुस्तकाच्या प्रति बेळगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रंथालयांना वितरित केल्या. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयामध्ये कानडी पुस्तक उपलब्ध आहेत. पण या ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तकांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील वाचकांना मराठी …
Read More »नवहिंद सोसायटीच्या संचालक मंडळाचा दिल्ली येथील लिडरशिप डेव्हलमेंट ट्रेनिंगमध्ये सहभाग
येळ्ळूर : अलिकडच्या काळात सहकार चळवळ अधिक मजबूत आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार खाते आणि राष्ट्रीय को – ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इडिया (NCUI) या संस्था प्रयत्नशिल आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 8 जुलै ते 10 जुलै 2024 पर्यंत मल्टीस्टेट संस्थांच्या चेअरमन आणि संचालकांना लिडर्शिप डेव्हलमेंट ट्रेनिंग प्रोग्राम …
Read More »मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला …
Read More »विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित
बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम …
Read More »“त्या” नराधमावर कठोर कारवाई करावी; कडोली ग्रामस्थांचा निषेध
बेळगाव : कडोली गावात काल घडलेल्या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोली ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुटुंबाला गावातून हाकलून द्यावे, अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले. तत्पूर्वी कडोली ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार स्वेच्छेने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी …
Read More »राकसकोप जलाशय लवकरच भरणार; चार फूट पाण्याची आवश्यकता
बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने बेळगावनगरीतील नागरिकांना समाधान होत आहे. बेळगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेले राकसकोप जलाशय लवकरच भरणार आहे. 0.60 टीएमसी क्षमतेच्या जलाशयाची एकूण उंची 2475 फूट आहे. आजची पाण्याची पातळी 2471.4 फूट …
Read More »अनमोड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
खानापूर : बेळगाव लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावच्या सीमेवर मुसळधार पाऊस पडत आहे. बेळगाव-पणजी मार्गावरील अनमोड घाटात दूधसागर देवस्थान नजीक आज पहाटे दरड कोसळली असून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. लवकरच रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात येईल. दरड कोसळत असल्याने या घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी …
Read More »पंढरपूर येथे बेळगावच्या तरुणाचे निधन
बेळगाव : वडगाव सोनार गल्लीमधील एका तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदर घटना बुधवारी (दि. १७) सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रवीण वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta