Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटी स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

  बेळगाव : स्वामी विवेकानंदांनी बेळगावला दि. १६ ऑक्टोबर १८९२ रोजी भेट दिली होती. या भेटीच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिसालदार गल्लीतील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दि. १६ रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ८.३० या वेळेत विशेष सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला …

Read More »

व्ही. एस. पाटील हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमधील सन 1993 ते 2003 या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच खेळीमेळीत उत्साहाने पार पडले. स्नेहसंमेलनाची सुरवात राष्ट्रगीतानंतर शाळेचे दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर पहिले ते दहावीपर्यंत आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर करून स्वागत …

Read More »

हनीट्रॅपचा आरोप असलेल्या महिलेची गळ्यात चप्पल घालून मध्यरात्री काढली धिंड!

  बेळगाव : मल्लापूर, घटप्रभा, गोकाक तालुक्यात हनीट्रॅपचा आरोप झाल्याने स्थानिक लोकांनी मध्यरात्री एका महिलेला हार घालून तिची धिंड काढल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथे घडली. मल्लापूर येथील मृत्युंजय सर्कलमध्ये स्थानिक महिला आणि पुरुषांनी श्रीदेवी नावाच्या महिलेला चप्पल हार घालून मध्यरात्री रस्त्यावरून तिची धिंड काढली आणि काही महिलांनी तिला मारहाण …

Read More »

क्षुल्लक वादातून गोजगा गावात तरूणाचा खून

  बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादातून धारदार विळ्याने सपासप वार करून खून केल्याची घटना गोजगा (तालुका बेळगाव) येथे शनिवारी (ता.14) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. राजू बंडू नाईक (वय 32) व मारूती नाईक (वय 32) या दोघामध्ये सतत वाद होत असत. आजही क्षुल्लक कारणावरून दोघांत वादाची ढिणगी पडली. वाद …

Read More »

हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा : ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे

  बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ अंथश्रद्धा निर्मूलन समिती व प्रगतिशील लेखक संघ यांच्यावतीने शुक्रवारी हुतात्मा चौकात धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, प्राध्यापक, पत्रकार आणि …

Read More »

विविध समस्यांबाबत उद्यमबाग जिल्हा कामगार भवनसमोर बांधकाम कामगारांचा मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगार आपल्या वेगवेगळ्या समस्याबद्दल उद्यमबाग येथील जिल्हा कामगार भवनसमोर संघटीतपणे मोर्चात सामील झाले होते. यावेळी कामगारांनी आपल्या तक्रारी जिल्ह्याच्या कामगार अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ॲड. एन. आर. लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगार संघटना, मजदूर नवनिर्माण संघ आणि अहिंद अॕडव्होकेट्स असोसिएशनतर्फे शुक्रवार दि. 13/10/23 रोजी सायंकाळी 5 …

Read More »

दसरा मुख्यमंत्री हॉकी स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा

  बेळगांव : बेळगावला हाॅकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हाॅकी स्पर्धेसाठी बेळगावचा महिला हॉकी संघ रवाना होत आहे, महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावची एस्ट्रोतर्फ हॉकी मैदानाची मागणी …

Read More »

मानवी तस्करी, गुलामगिरी रोखण्यासाठी उद्या मूक मोर्चाचे आयोजन

  बेळगांव (वार्ता) : अलीकडे बेंगळुरू पाठोपाठ कर्नाटक राज्यात महिला आणि मुलांचे लैंगिक अत्याचार आणि विक्रीच्या अनेक घटनांमध्ये वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्याची सीमा महाराष्ट्र, गोव्याला लागून आहे. विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हरवलेली मुले, लैंगिक अत्याचार, पीओसी कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रेम प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बेळगावात याला आळा घालण्यासाठी …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन 18 नोव्हेंबर रोजी

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये 23 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रथमतः प्रबोधनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. बैठकीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत निषेध …

Read More »

खेळाडूच्या स्वप्नपूर्तीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलची लाभली साथ

  बेळगाव : सेवानिवृत्त शिक्षक श्री. वाय.पी. नाईक यांना बेळगाव जवळील बहाद्दरवाडी गावातील खेळाडूचा फोन आला. खेळात सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. लागलीच श्री. वाय. पी. नाईक यांनी त्यांचे मित्र श्री. संतोष दरेकर यांना फोन केला आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या संतोष यांनी रियाला मदत करण्यासाठी त्याच्या मित्रांना …

Read More »