Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

कुंतीनाथ कलमनी यांना प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हल्लीये संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ कलमणी यांना दक्षिण भारत जैन सभेतर्फे प्रतिष्ठेच्या प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 15 मे रोजी सांगली शहर महाराष्ट्र येथे दक्षिण भारत जैन सभेचे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शताब्दी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान …

Read More »

अनगोळ येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरचा वर्धापन दिन सोहळा साजरा

बेळगाव : श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर एस. व्ही. रोड अनगोळ श्रीं चा 24 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी गणेश पूजा व गणहोम करून सुरुवात करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका …

Read More »

विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजल्या शाळा!

बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्यात आज सोमवार दि. 16 पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू केल्या जात होत्या. परंतु यंदाच्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी 15 दिवस आधीच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रविवार पासून …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक खेळीमेळीत संपन्न

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेची बैठक रविवार दि. 15 मे रोजी खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी हे होते. खजिनदार पोमाण्णा कुन्नूरकर यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी भरवण्यात आलेल्या भव्य आखाड्याचा जमा-खर्च सादर केला. साधक-बाधक चर्चा होऊन उपस्थित सदस्यांनी जमाखर्चास मंजुरी दिली आणि दरवर्षी भव्य कुस्ती …

Read More »

मराठा एकता एक संघटनेचे राज्य मराठा विकास महामंडळाला निवेदन

बेळगाव : आज रविवार दिनांक 15/05/2022 रोजी कर्नाटक राज्यातील मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. एम. जी. मुळे यांचे बेळगावमध्ये मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या सर्वांसमवेत श्री. एम. जी. मुळे यांचा …

Read More »

मराठा – मुस्लिम समाजात ऐक्याचे दर्शन

बेळगाव : आज गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित शोभायात्रे दरम्यान मुस्लिम समाजातील नेत्यांनी संपूर्ण शोभायात्रेतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे बेळगावात एकप्रकारे मराठा-मुस्लिम समाजात ऐक्याचे दर्शन घडले. अमजद अली मोमिन, अश्पाक घोरी, अहमद रश्मी, हमीद बागलकोटी, सुभान बिजापुरे, अब्दुल बागलकोटी, राहुल केसरकर, मुदस्सर बागलकोटी आदी मुस्लिम बांधव उपस्थित …

Read More »

मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील : मंजुनाथ भारती स्वामींचे प्रतिपादन

बेळगाव : संस्कार- संस्कृती टिकविणे हाच मानवधर्म आहे. गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मराठा दुःखी पिडीत, असहाय्य असलेल्यांसाठी काम करणारा खरा क्षत्रिय आहे. मराठा समाज शास्त्रीयदृष्ट्या मर्यादित राहणार आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील नेत्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्याचबरोबर नेत्यांनाही समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे प्रतिपादन …

Read More »

जैन समाजाचा आचार आणि विचारातून अहिंसेचा संदेश : उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली : अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, …

Read More »

सकल मराठा समाजाचा उद्या “गुरुवंदना” कार्यक्रम

बेळगाव : येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि पायोनियर बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण …

Read More »

धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय …

Read More »