Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यात दहा ठिकाणी स्मारक उभे करण्यात यावे, यासह वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावे यासाठी सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक आणि वस्तुसंग्रहालय तसेच संशोधन केंद्र निर्माण समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

Read More »

समर्थ नगर येथे पारायण सोहळ्यानिमित्त ग्रंथ दिंडी भक्तिभावात

बेळगाव : मेन रोड समर्थनगर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संप्रदायीक पारायण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी नुकतीच भक्तिभावाने पार पडली. शहरातील समर्थनगर मेन रोड येथे आज शनिवारपासून येत्या सोमवार दि. 25 एप्रिलपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त समर्थनगर परिसरात काल शुक्रवारी ग्रंथदिंडी …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडा

बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस …

Read More »

शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी केली पाहणी

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंती आणि रमजान तिन्ही एकाचवेळी आल्याने बेळगाव पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. बेळगावात आज शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केली. बेळगावात शिवजयंती उत्सवासाठी क्षणगणना सुरु झाली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीची तयारी आतापासूनच उत्सव मंडळांनी सुरु केली आहे. …

Read More »

जिल्हा प्रशासनाकडून त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी; मध्यवर्ती समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : सरकारी कार्यालयं, रस्ते, बसेस आदींच्या नामफलकांमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा प्रशासनासह बेळगाव महापालिकेकडून कालपासून शहरातील रस्त्यांचे नामफलक मराठी भाषेत उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनासह स्मार्ट सिटी, बेळगाव महापालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या नामफलकांमध्ये त्रिभाषा सूत्राचा …

Read More »

बेळगाव बार असोसिएशनतर्फे उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमात जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना न्यायाधीश सी. एम. …

Read More »

एपीएमसी पोलीस ठाण्याला मुस्लिम नेत्यांचा घेराव घालून निदर्शने

बेळगाव : बेळगावातील एपीएमसी पोलीस ठाण्याला मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी अचानक घेराव घालून पोलिसांच्या उपद्रवाचा निषेध केला. काळ, गुरुवारी रात्री काही पोलिसांनी आझमनगर मुख्य रस्त्यावर दादागिरी करत उर्मटपणे अश्लील शिवीगाळ करत छोटीछोटी दुकाने बंद करायला भाग पाडले. समाजसेवक इम्रान फत्तेखान यांनी त्याचा जाब विचारल्यावर त्यांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली. या घटनेच्या …

Read More »

राज्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ; बेळगाव जिल्ह्यात 90 केंद्रांत परीक्षा

बेळगाव : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. परीक्षा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थीही खूप उत्सुक दिसून येत होते. बेळगाव जिल्ह्यात पीयूसी परीक्षेसाठी एकूण 51,853 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एकूण 90 केंद्रांत परीक्षा सुरू आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24,046, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27,807 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली आहे. जिल्हा कोषागारातुन …

Read More »

बेळगावात 24 एप्रिलला आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. कोल्हापूरच्या खासबाग मैदान आखाड्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नामवंत आखाडा म्हणजे बेळगावचा आनंदवाडी आखाडा होय. या आखाड्याची आसन …

Read More »

वायव्य शिक्षक निवडणूकीसाठी प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी

                बेळगाव : कर्नाटकातील वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश हुक्केरी यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली. प्रकाश हुक्केरी हे ज्येष्ठ राजकीय …

Read More »