Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली वृद्धाला मायेची ऊब!

बेळगाव : पहाटे पाच वाजता टिळकवाडी येथील दुसरा रेल्वे गेट जवळ एक अज्ञात वृद्ध व्यक्ती उघड्या अवस्थेमध्ये एका बंद वाहनावर बसवण्यात आली होती. त्याचे वय सुमारे 65 वर्षे होते. थंडीने कुडकुडत बसलेल्या त्या वृद्धाकडे सफाई कामगार महिलांची नजर गेली. या भागात दैनंदिन कचरा गोळा करणार्‍या तिघा महिला अनुक्रमे शारदा, भारती …

Read More »

बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना कोरोना

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा सुरु झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बेळगाव जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह …

Read More »

शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड द्यावी : रवींद्र पाटील

बेळगाव शहर समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व शहर आणि भारती विद्यालय खासबाग बेळगाव यांच्यावतीने समाज विज्ञान विषय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी. एस. लमाणे होते. अभ्यासक्रमातील समाज विज्ञान हा महत्वाचा विषय असून कला शाखेतील शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्ययन …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांचा आधारवड हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : सीमाभागातील मराठी भाषिकांचे आधारवड, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या …

Read More »

मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही!

  म. ए. समिती-शिवसेनेतर्फे बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आज बेळगावात अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही असा ठाम निर्धारच या निमित्ताने करण्यात आला. रामदेव गल्लीतील हुतात्मा स्मारकात सोमवारी सकाळी …

Read More »

वॉर्ड क्रमांक 50 मधील नगरसेविकेची नागरिकांवरच अरेरावी

बेळगाव (वार्ता) : सध्या बेळगाव शहरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या अनुषंगाने समाजसेविका माधुरी जाधव यांनी स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून वडगाव भागातील नागरिकांच्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 50 मधील आनंदनगर दुसरा क्रॉस येथील समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील तसेच परिसरातील महिलांशी संपर्क साधून पाण्याच्या समस्येबाबत चर्चा करत …

Read More »

रुबेलाचे इंजेक्शन दिल्यामुळे 3 बाळांचा मृत्यू

बेळगाव : रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिघा बाळांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्र हुलगुर (13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि चेतन पुजारी (15 महिने) यांचा मृत्यू झालायं. तीन दिवसांपूर्वी चौघा बाळांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण आता तिघांचा मृत्यू झाला आहे. बालकांमध्ये …

Read More »

इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू

बेळगाव (वार्ता) : 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार 17 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. अथणी …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज यांचा 342 राज्याभिषेक दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती यांच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराज यांच्या मूर्तीला लोकप्रिय आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच पुजा करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समिती बेळगाव यांच्यावतीने …

Read More »

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »