बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या 9व्या फोन-इन कार्यक्रमात शहरासह जिल्ह्यातील जनतेने फोन करून त्यांच्या समस्या मांडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित फोन-इन कार्यक्रमात बुदरकट्टी गावातील रस्त्याच्या समस्येमुळे शासकीय शाळेत जाणाऱ्या मुलांची अडचण होत आहे. एका व्यक्तीने एसपींना फोन करून जिथे …
Read More »भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरण कार्यक्रम
येळ्ळूर : विद्यार्थ्यांनो तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्यातील आळस झटकून टाका, त्याचबरोबर तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, दूरदृष्टी व महत्त्वकांक्षा या गोष्टी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत. नव्या जगात स्पर्धा खूप आहे, त्या स्पर्धेत आपल्याला टिकून राहावयाचे झाल्यास आपल्याला लढावे लागेल, झगडावे लागेल व चिवट झुंज द्यावी लागेल …
Read More »मराठी विद्यानिकेतन बालमंदिर विभागाकडून आई, पालकांसाठी आरोग्य चर्चा सत्राचे आयोजन
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव बालमंदिर विभागातील अंकुर व शिशु वर्गाच्या आई, पालकांसाठी महिला दिनानिमित्त डॉ. गायत्री येल्लापूरकर यांचे आरोग्य विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत सर म्हणाले, महिलांना दररोजच्या कामातून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो स्त्री जरी यशाच्या शिखरावर …
Read More »राजहंसगडावरील दुग्धाभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करणार; येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्णय
येळ्ळूर : येत्या 19 मार्च रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येळ्ळूर राजहंसगड येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा साजरा करण्याचा निश्चय केला आहे. सदर दुग्धाभिषेक सोहळ्यात प्रामुख्याने सहभागी होऊन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. शांताराम …
Read More »बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीचा झेंडा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे
बेळगाव : बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीच्या अध्यक्ष पदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंत अष्टेकर, सेक्रेटरी विष्णू मोरे तर खजिनदार पदी कल्लाप्पा अष्टेकर यांची बिन विरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे गावच्या प्रत्येक नागरिकांना प्रतीष्ठीचा विषय होता. गेल्या एक वर्षा पासून या निवडणुकीसाठी संपूर्ण गाव राजकारणात धगधगत होते. गावचा …
Read More »राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी नियोजन कमिटीची स्थापना
बेळगाव : दिनांक 19/03/2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे संपन्न झाली व यावेळी कार्यक्रम नियोजन कमिटी ठरविण्यात आली. महाप्रसादाच्या नियोजनाची जबाबदारी येळ्ळूर- येळ्ळूर विभाग समिती व परिसरातील गावावर सोपविण्यात आली असून देणगी व साहित्य …
Read More »शहापूर, वडगाव भागात रंगपंचमी उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी बेळगाव तालुक्यासह शहराच्या दक्षिण भागात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. शहरात विशेषत: …
Read More »चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…
बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व कमी खर्चात त्यांच्यावर औषध उपचार व्हावेत. यासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल व होनगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात करण्यात आले होते. या शिबिराचे …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुक आणि राजहंसगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहर म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक …
Read More »शिवाजी कागणीकर ‘मानद डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित
बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांना गदग तालुक्यातील नागाव येथील ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाच्यावतीने राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डॉक्टर’ पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गदगच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta