Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांनी केली मतदान केंद्राची पाहणी

  मतदान केंद्रात किमान पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी आज बुधवारी विविध विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पायाभूत सुविधांची पाहणी …

Read More »

हलगा येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला डिजिटल भारताचा नकाशा भेट

  बेळगाव : हलगा येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला डिजिटल भारताचा नकाशा देण्यात आला. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष परशराम हनमंताचे, उपाध्यक्ष तानाजी संताजी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्याकडे हा नकाशा देण्यात आला. बुधवार दिनांक 8 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे सहशिक्षक आर …

Read More »

कचरा उचल करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अज्ञातांनी लावली आग

  बेळगाव : हिंडलगा येथील बॉक्साईट मुख्य रस्त्या शेजारी लावण्यात आलेल्या कचरा वाहू करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञात व्यक्तींनी आग लागल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील मधील घरोघरी जाऊन कचरा उचल करण्याचे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येते.आज सुट्टी असल्याने कचराने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली …

Read More »

मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून

  बेळगाव : मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना मच्छे येथे शेतवाडीत घडली आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मजगाव लक्ष्मी गल्लीतील प्रतीक एकनाथ लोहार (वर्ष 23) या युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिरा शेजारी शेतवाडीमध्ये बोलावून नेले. तेथे प्रतीकचा चाकू व जांभ्या भोसकून खून …

Read More »

पिरनवाडीच्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू

  बेळगाव : धूली वंदना निमित्त रंग खेळून झाल्यावर मित्रांसोबत धरणावर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला आहे. अविनाश अरविंद देवलेकर वय 22 रा.सिध्देश्वर गल्ली पिरनवाडी असे या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी …

Read More »

बेळगावात रंगपंचमी जल्लोषात साजरी

  डॉल्बी लावून रंगोत्सव साजरा बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणांकडून यंदा पावडर कलर वापरण्यावर भर देण्यात आला होता. एक ठिकाणी कारंजाची व्यवस्था केल्यामुळे पाण्यात चिंब होवून गाण्याच्या ठेक्‍यावर नृत्य करत रंगांची उधळण करत युवक-युवतींनी रंगपंचमी खेळण्याला …

Read More »

गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव उद्या मंगळवारपासून

  गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना निर्बंधानंतर आता निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत आहे. यात्रेतील वाढती …

Read More »

प्रभावती फाउंडेशनतर्फे उद्या “रंग बरसे” कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रभावती फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी बीएससी मॉलच्या बाजूला असलेल्या शुक्रवार पेठ येथील खुल्या जागेत होळी निमित्त “रंग बरसे” हा महिलांसाठी रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत …

Read More »

उचगाव मळेकरणी देवी वार्षिकोत्सवाला उद्यापासून सुरुवात

  बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित …

Read More »

संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज : किरण जाधव

  बेळगाव : संस्कारपूर्ण शिक्षण उन्नतीसाठी आवश्यक असून संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज असल्याचे भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. मजगाव येथील श्री 1008 भगवान दिगंबर जैन मंदिर, रत्नत्रय नगरी येथे श्री सिद्धचक्र आराधना महामंडळ विधान महोत्सव सुरू आहे. 27 …

Read More »