Sunday , July 26 2026
Breaking News

‘नवहिंद सोसायटी’च्यावतीने सोने परिक्षण व मूल्यांकन प्रशिक्षण शिबीर संपन्न

Spread the love

 

बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ नवनवीन उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. सर्वसामान्यांचे हित जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोने परिक्षण आणि मूल्यांकन प्रशिक्षण शिबिराचा सोसायटीच्या व्यवसायासाठी चांगला उपयोग होण्यास मदत होईल’, असे विचार माजी नगरसेवक श्री. नेताजीराव जाधव यांनी शिबिराचे उद्घाटन करताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर हे होते.
प्रारंभी व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी प्रस्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. पुणे प्रशिक्षण संस्थेचे सी.ई.ओ. श्री. अनिल लटके यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्षस्थीय भाषणात चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी ‘कर्मचारी हा सोसायटीचा कणा आहे. कर्मचाऱ्यांनी सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन उत्तम ज्ञान आत्मसात करून सोसायटीच्या व्यवसायवृद्धीसाठी हातभार लावावा,’ असे आवाहन केले.
याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर, प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. दशरथ पाटील, नवहिंद सोसायटीचे संचालक श्री. प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर, सौ. नीता जाधव, श्रीमती एस. वाय. चौगुले, असि. जन. मॅनेजर नारायण वेर्णेकर, रिकव्हरी हेड श्री. जे. एस. नांदुरकर, सर्व शाखांचे मॅनेजर व प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी माजी चेअरमन श्री. उदय जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *