Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

रोटरी परिवारातर्फे मिळणार मोफत कृत्रिम अवयव

बेळगाव : रोटरी परिवार, बेळगाव असोसिएशन साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्यावतीने बेळगावमध्ये रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित केले गेले आहे. सदर शिबिर विजया ऑर्थो आणि ट्रामा सेंटर अयोध्या नगर येथे पार …

Read More »

काळादिन मोर्चात बेळगाव शिवसेनेचाही सहभाग

बेळगाव : मराठी भाषिकांवर अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होऊन संपूर्ण पाठिंबा दर्शवण्याबरोबरच 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या फेरीत ताकदीने उतरण्याचा निर्णय बेळगाव शिवसेनेने जाहीर केला आहे. शिवसेनने (सीमाभाग -बेळगाव) आज गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त निर्णय जाहीर केला …

Read More »

कुद्रेमानी समितीचा विराट मोर्चाला जाहिर पाठिंबा

कुद्रेमानी : मराठी भाषा, संस्कृती जतन करून स्वाभिमानाने अस्मिता टिकविण्यासाठी गेली ६५ वर्ष सीमाबांधव सीमालढा लढतो आहे. मराठी भाषिकांना अल्पसंख्यांक आयोगाने हक्क देणे, मराठीत कागदपत्रे मिळावीत अशा विविध मागण्याकरिता हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन सीमाकवी रवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना …

Read More »

१९८३ मराठा मंडळ हायस्कूलच्या माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा आयोजन बैठक

१४ नोव्हेंबर रोजी स्नेह ऋणानुबंध मेळावा बेळगाव (रवी पाटील) : बेळगाव येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सन १९८३ माजी विद्यार्थ्यांची आयोजन बैठक मिलेनियम गार्डनच्या बाजूला डी. एस. जाधव यांच्या कार्यालयात डी. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी या बैठकीत रविवार दि. १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वा. ईफा हॉटेल क्लब …

Read More »

उद्या तालुका समितीची बैठक

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकटीसाठी आणि काळा दिन आणि 25 रोजी मोर्चा संबंधी विचार विनिमय करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होणार आहे. मंगळवारी 19 रोजी दुपारी 2 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका म.ए. समिती …

Read More »

बुद्धिबळाचा खेळ व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक : डीसीपी डॉ. विक्रम आमटे

गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी आयोजित बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात बेळगाव : बुद्धिबळाचा खेळ बुद्धीला चालना देणारा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक आहे, असे बेळगावचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले.भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहयोगाने आयोजित एक दिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख …

Read More »

ऑपरेशन मदत अंतर्गत जिव्हाळा फौंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

चंदगड : डोंगर माथ्यावर वसलेलं वीस घरांच्या वस्तीचा आणि जवळपास शंभर एक लोकसंख्येचा, चंदगड पासून पश्चिमेला 7/8 किलोमीटर अंतरावर वसलेला जंगलातील दुर्गम काजीर्णे धनगरवाडा. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही की पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, अशाही परिस्थितीत गावातील मूलं उन्हाळ्यात डोक्यावर उन्हाची कायली सोसत व पावसाळ्यात पायात चिखलवाट तुडवत, …

Read More »

येळ्ळूरमधील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक संपन्न

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची बैठक रविवार (ता.17) रोजी सकाळी 11-00 वाजता शाळेच्या सभागृहात, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षक संजय मजूकर यांनी बैठक बोलावण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. सी. एम. …

Read More »

प्रा. सी. व्ही. पाटील यांचे निधन

बेळगाव : मूळचे येळ्ळूर व सध्या सदाशिवनगर येथील रहिवासी, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक, शेतकरी कामगार पक्षाचे बेळगावातील एक धुरीण, ज्योती महाविद्यालयातील हिंदीचे सेवानिवृत्त प्रा. सी. व्ही. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते.वार्धक्यामुळे गेले काही दिवस ते आजारी होते त्यांच्यावर घरातच उपचार सुरू होते. काल …

Read More »

नियोजित वेळेतच श्रीदुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करा

बेळगाव : बेळगाव शहरातील श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन शासनाने दिलेल्या नियोजित वेळेतच करा अश्या सूचना पोलीस अधिकार्‍यांनी केल्या सर्वच पोलीस स्थानकानी त्या त्या पोलीस स्थानक हद्दीतील मंडळांना तश्या सूचना केल्या आहेत. कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचा दसरा उत्सव साध्या पद्धतीने शांततेत साजरा करावा आणि कोणत्याही परिस्थितीत श्री दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन …

Read More »