बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयोजनातुन महाराष्ट्र एकीकरण समिती धामणे विभाग रचना संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. तरी धामणे विभागातील ब्रह्मलिंगहट्टी, मासगोंडहट्टी, देवगनहट्टी येथील सर्व कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांनी बसवाना मंदिर धामणे येथे सोमवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी ठीक 8:00 वाजता बैठकीला उपस्थित राहायचे आहे, अशी कळकळीची …
Read More »पिरनवाडी येथे म. ए. समितीची उद्या बैठक
बेळगाव : पिरनवाडी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ६-०० वाजता रामदेव गल्ली येथील राम मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली असून बाळगमट्टी, खादरवाडी, मच्छे, मजगाव, झाडशहापूर, अनगोळ येथील स्थानिक नेते तसेच …
Read More »19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त घरावर भगवा लावा; रमाकांत कोंडूस्कर यांचे आवाहन
बेळगाव : स्वाभिमानाचे, शौर्याचे प्रतीक समजला जाणारा भगवा प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने फडकवावा. येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म दिवस शिवजयंती म्हणून साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक हिंदूंनी मराठी माणसांनी सण म्हणून साजरा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आज आपण हिंदू राष्ट्रात …
Read More »यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस
बेळगाव : वडगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यरमाळ रोड परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यरमाळ रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीचा चावा घेतला आहे. मागील आठवड्यात वडगाव स्मशानभूमीजवळ कुसाणे नामक व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व त्यांचे …
Read More »“चलो मुंबई”च्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री देसाई यांची भेट
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज रविवारी सकाळी पाटण येथे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारीचा नियोजित ‘चलो मुंबई’ मोर्चा आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादासंदर्भातील विविध ताज्या घडामोडींबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर …
Read More »हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन
बेळगाव : शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांचे पती …
Read More »गोकाक येथील प्रसिद्ध होलसेल व्यापाऱ्याचे अपहरण व खून
गोकाक : गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) यांचे शुक्रवारी अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी गोकाक पोलिसांत केली होती. पण आज त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) हे शुक्रवारी सायंकाळी ते सहाच्या सुमारास …
Read More »कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची २२० वी जयंती साजरी
बेळगाव (प्रतिनिधी) : दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोासयटी लि., यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांची २२० वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे मंदार मुतकेकर, व्हा. चेअरमन विजय …
Read More »‘तुझ्याशी राणी लगीन करीन गं’ अल्बमच्या चित्रीकरणाला प्रारंभ
बेळगाव : दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगावमधील कल्लेहोळ गावात के जे क्रिएशन्स डान्स अकॅडमी यांच्या ‘तुझ्याशी राणी लगीन करीन गं’ पहिल्या मराठी अल्बम सॉंग चे चित्रीकरण झाले कुमार जाधव व महादेव होनगेकर हे या अल्बम सॉंगचे निर्माते आहेत. या गीताचे दिग्दर्शन बेळगाव मधील लेखक दिग्दर्शक संतोष सुतार यांनी …
Read More »जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे व्यासपीठ म्हणजे साहित्य संमेलन होय : ॲड. शाम पाटील
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहुर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्लूर वाडी शाळेच्या पटांगणावर झाला. 18 व्या येळ्ळूर ग्रामीण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta