बेळगाव : एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, हवाई दलाचे प्रमुख (CAS) यांनी 06 जानेवारी 23 रोजी बेळगाव येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलला भेट देऊन नव्याने नियुक्त केलेल्या अग्निवीरवायूच्या प्रशिक्षणाची पाहणी केली. बेळगाव येथील सांबरा एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. अग्निवीरवायूचे प्रशिक्षण …
Read More »कॅपिटल वनच्या एकांकिका स्पर्धेमध्ये दर्जेदार संघाचा सहभाग
बेळगाव : कॅपिटल वन ही संस्था बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्य परंपरेचा इतिहास जोपासत गेली अकरा वर्षे बेळगाव शहरांमध्ये नाट्य चळवळ घडवून आणत आहे बेळगाव शहर व परिसरातील कलाकार, दिग्दर्शक निर्माते व रसिकाना कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या अनुषंगाने नाट्यपर्वणी उपलब्ध झालेली आहे. सुरवातीला स्थानिक एकही संघाचा सहभाग नसलेल्या या …
Read More »“रामायण पूर्व कथा” – विशेष मराठी प्रवचनाचे रविवारी आयोजन
बेळगाव : रामकृष्ण वेदांत संस्था (सोसायटी) बोस्टन, अमेरिकेचे अध्यक्ष स्वामी त्यागानंदजी महाराज यांचे रामायणाची पूर्वकथा या विषयावर मराठीत विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. रामकृष्ण मिशन आश्रम किल्ला येथे दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हे प्रवचन होणार आहे. स्वामी त्यागानंदजी महाराज हे रामकृष्ण मठात १९७६ मध्ये सहभागी …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा
बेळगाव : बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हते तर हाडाचे शिक्षकही होते. म्हणूनच त्यांनी “दर्पण”च्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पत्रकारितेबरोबरच शिक्षक, सामाजिक सुधारणा, साहित्य, संशोधन आदी क्षेत्रात त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. …
Read More »आ. अनिल बेनके ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगावातील सरदार्स हायस्कूल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शहरातील सरदार्स मैदानावर आज शुक्रवारी अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर …
Read More »‘उद ग आई’च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमला!
लाखो भाविकांच्या सहभागात शाकंभरी पौर्णिमा यात्रा बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा आज शुक्रवारी साजरी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर हजर झाले आहेत. आज शुक्रवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, …
Read More »बेळगावातील दीड कोटींच्या गजेंद्रची महाराष्ट्रात चर्चा
सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापुरात सध्या बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गजेंद्र नाव असलेल्या 5 वर्षांच्या या रेड्याला हरियाणातील मंडळींनी तब्बल दीड कोटीत विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. सोलापुरात प्रसिद्ध सिद्धेश्वर …
Read More »येळ्ळूर येथील भाविकांसाठी केले सामाजिक कार्यकर्त्यांनी जमिनीचे सपाटीकरण
बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवी यात्रा आटोपून येळ्ळूरला परतणाऱ्या भाविकांचा पडल्या भरणे कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने यल्लाप्पा पाटील व त्यांचे मित्र प्रशांत नंदीहळ्ळी यांनी गावच्या थडे देवस्थान जवळील जमिनीचे स्वखर्चाने सपाटीकरण व स्वच्छता केली आहे. सालाबाद प्रमाणे येळ्ळूर गावचे सर्व भाविक सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थानला …
Read More »एमईए संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव : “चांगला शिक्षक शिकवितो पण उत्कृष्ट गुरु प्रेरणा देतो आणि घडवितो. अशीच उत्कृष्ट गुरुची भूमिका एमईए या इंग्रजी संभाषण कौशल्य शिकविणाऱ्या संस्थेचे संचालक राजशेखर कोळीमठ पार पाडत असून त्यांनी आजतागायत तब्बल पन्नास हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे देऊन घडविले आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे लिंगराज महाविद्यालयाच्या इंग्रजी …
Read More »सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
येळ्ळूर : सरकारी मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे 03/1/2023 रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रसिका रवींद्र धामणेकर उपाध्यक्षा एसडीएमसी एमएचपीएस येळ्ळूर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. दीपप्रज्वलन प्रसिद्ध कायदे सल्लागार श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी, सौ. राजकुंवर तानाजी पावले, सौ. वीणा सतीश पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta