Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आनंदवाडी आखाड्याची पाहणी

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने येत्या 8 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती आखाड्याच्या पूर्व तयारीसाठी आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदवाडी आखाड्यात जाऊन आखाड्याची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार, पप्पू होनगेकर, संतोष होंगल, शुभम नांदवडेकर, संजय चौगुले, नरहरी माळवी, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

Read More »

खडतर प्रवास मराठीचा!

  बेळगाव : स्मार्टसिटीअंतर्गत बेळगावात सुसज्ज बस स्थानकाचे उद्घाटन नुकताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात आले. या हायटेक बस स्थानकात मराठी भाषेला कुठेच स्थान नाही. त्यामुळे बेळगावसह सीमावासीयांत नाराजी पसरली आहे. बेळगाव परिसरात बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. त्रिसूत्रीय धोरणानुसार कन्नडसह मराठी भाषेत फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र कर्नाटक …

Read More »

लक्ष्मीसेन भट्टारक यांचे 29 डिसेंबर रोजी बेळगाव नगरीत आगमन

  बेळगाव : जैन धर्मातील अतिप्राचीन धर्मपीठ आणि दिल्ली, कोल्हापूर, जिनकांची, पिनागोंडी, रायबाग, होसूर (बेळगाव) येथील स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचा होसूर बेळगाव नगरीत 29 रोजी दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे. दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता गोमटेश विद्यापीठ, हिंदवाडी येथून 1008 मंगल कलश, हत्ती आणि रथ घेऊन …

Read More »

मंदिर नूतनीकरणासाठी किरण जाधव यांची सढळ हस्ते देणगी

  बेळगाव : संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी नाभिक समाज सुधारणा मंडळांने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा भाजप नेते व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी सढळ हस्ते आर्थिक देणगी दिली. संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी …

Read More »

होदेगेरी येथील छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांची भेट

  बेळगाव : स्वराज्य संकल्पक छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळी ‘होदेगेरी’ येथे नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दि. 28 डिसेंबर 2022 रोजी भेट दिली. स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे जन्मदाते शहाजी महाराज यांच्या समाधीवर छप्परही नाही आणि इतर कोणतीच सुधारणा केली नाही. 20 गुंठे जागेवर असलेली ही समाधी …

Read More »

शोकसभेत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे मंगळवारी सायंकाळी आयोजित शोकसभेमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील कॅम्प येथील …

Read More »

एक इंचही जमीन कोणाला देणार नाही : कर्नाटक विधान परिषदेतही ठराव

  महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपल्याचा कांगावा बेळगाव/बंगळूर : महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न संपला असून, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकाची जमीन, पाणी आणि भाषेच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा आशयाचा ठराव कर्नाटक विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आला. कायदामंत्री माधुस्वामी यांनी मांडलेल्या या ठरावावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते बी. के, …

Read More »

प्रकाश शिरोळकरांचा आढमुठेपणा!

बेळगाव : 66 वर्षाचा सीमालढा नेहमीच गांभीर्याने लढला जातो. अनेक हुतात्म्यांनी बलिदान देऊन आणि अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन हा लढा जिवंत ठेवला आहे. या लढ्याचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत गढूळ होऊ नये याची दक्षता सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता कांही अप्रिय घटना घडतात आणि त्यावेळी सीमावर्ती भागातील …

Read More »

सीमाभागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांचा मुख्यमंत्री सहायता देणगी योजनेत समावेश, महात्मा फुले जन आरोग्य योजनाही लागू नागपूर : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा …

Read More »

अरविंद कापाडिया यांनी येळ्ळूर ग्रामपंचायत ग्रंथालयाला दिली पुस्तकांची भेट..

  बेळगाव : पुस्तकं दान केल्याचा आनंद हा वेगळा असतो, हे ज्ञान दान दिल्यानं कमी न होता वाढणार असं एकमेव दान आहे. अरविंद कपाडिया यांनी येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयात बरीच पुस्तके देऊन वाचक वर्ग वाढवा अशी इच्छा व्यक्त केली. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सरकारच्या योजनेअंतर्गत येळ्ळूर पंचायत अध्यक्ष …

Read More »