बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार …
Read More »मिनी मॅरेथॉनमध्ये अनुज पाटील, नकोशा मंगनाकर विजेते
बेळगाव : मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने आयोजीत मिनी मॅरेथॉन शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर शर्यतीतील खुल्या मुला -मुलींच्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे अनुज मारुती पाटील (गणेशपुर) आणि कु. नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे) यांनी पटकाविले. सदर मॅरेथॉन शर्यतीत विविध खेड्यातील 100 हून …
Read More »कॅम्प येथील वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनची मदत
बेळगाव : कॅम्प येथील दोन असह्य वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात आली आहे. कॅम्प येथे एका त्या घरामध्ये दोन महिला रहात होत्या तसेच त्यांची परिस्थिती देखील बिकट बनली होती. ही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलांशी बोलून अडचणी समजून घेतल्या आणि एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांना फोन …
Read More »खासगी शाळेची बस उलटली; विद्यार्थी सुखरूप
अथणी : तालुक्यातील शेगुणसी गावात एका खासगी शाळेची बस पलटी झाली. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरूप बचावले. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह 10 विद्यार्थी होते. सुदैवाने बस पलटी झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. तालुक्यातील अनेक भागात खासगी कंपन्यांनी डोके वर काढले असून बसचालकांना …
Read More »वंटमुरी प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बेळगाव : न्यु वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय …
Read More »गॅस सिलिंडरच्या स्फोटात बालकासह 7 जण जखमी
गोकाक : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळासह सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात हा प्रकार घडला असून रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेल्याने स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडर अचानकपणे वास …
Read More »सौंदत्ती यल्लमा डोंगर पर्यटनस्थळासाठी सरकार कटीबद्ध, मंत्री एच.के.पाटील यांचे आश्वासन
बेळगाव : सौंदत्ती यल्लमा डोंगर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन, राज्याचे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी केले. काल शनिवारी यल्लमा डोंगरावर मंत्री एच. के. पाटील यांनी भेट देऊन तेथे चाललेल्या विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शुक्रवारी पार पडलेल्या विधिमंडळाच्या …
Read More »न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला सरकारकडून जमीन देण्याचे आदेश
बेळगाव : बेळगाव शहराजवळ असलेल्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला 2.03 एकर जमीन देण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. काकती पोलीस स्थानक हद्दीत येणाऱ्या न्यू वंटमुरी येथील पीडित महिलेला कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जाती विकास मंडळाने जमीन मालकी योजनेअंतर्गत जमीन देण्याचे आदेश देण्यात …
Read More »महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण काही वर्षपासून सुरू आहे, कंत्राटदारांनी या कामासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक या सीमावर्ती भागातील कामगार आणलेले आहेत, त्यामध्ये पुरुषांबरोबरच महिलाही आपल्या तान्हुल्यांसह उदरनिर्वाहासाठी कार्यरत असतात. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावात कडाक्याची थंडी पडली असून या कामगारांच्या लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, रात्री …
Read More »बहुजनांच्या विकासासाठी मराठा समाजाचे मोठे योगदान : प्रकाश मरगाळे
बेळगाव : बेळगाव परिसरातील उद्योगधंदे हे प्रामुख्याने बहुजनांच्या हातात होते. येथील कापड उद्योग, बेकरी व्यवसाय, सोने-चांदी व्यवसाय, उद्मबाग येथील फौंड्री, लेथ मशीन हे सगळे व्यवसाय सांभाळणारी सर्व आपलीच माणसं होती आणि आमचा मराठा समाज शिक्षित, व्यवसायिक, व्यवहारीक आणि आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा, यासाठी मराठा समाजातील नेते ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई, बहिर्जी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta