Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

अब्दुल मुनाफ तिगडी जिल्ह्यातून हद्दपार

बेळगाव : रायान्ना नगर मजगाव येथील अब्दुलमुनाफ मैजूउद्दीन तिकडी या मटका बुकीला पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करून हावेरी येथे हलवण्यात आले.अब्दुलमुनाफ तिकडी या व्यक्तीवर 2011 पासून आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी याला न्यायालयाने शिक्षाही दिली आहे. इतके असून देखील अब्दुलमुनाफ तिकडी हा उद्यमबाग परिसरातील रोज कमून खाणाऱ्या कामगारांना …

Read More »

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अनिल बेनके! करणार उद्या पाहणी

बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत. शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी …

Read More »

चिक्कोडीत पावसाचा जोर! कृष्णेच्या पातळीत 5 फुटाने वाढ

चिक्कोडी : चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारी (ता. १८) देखील कृष्णा नदीवरील एक, दूधगंगेवरील चार व वेदगंगेवरील तीन असे आठही बंधारे पाण्याखालीच होते. पाऊस कायम असल्याने कृष्णेच्या पातळीत पाच तर दूधगंगा व वेदगंगा …

Read More »

हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांना पोलीस खात्याने संरक्षण द्यावे

बेळगाव : मा.उच्च न्यायालयाचा आदेश तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने हालगा-मच्छे बायपास प्रकरणी झिरो पॉईंट ग्रहित झाल्याशिवाय बायपासचे कोणतेही काम सूरु करु नये असा निर्वाळा देत दावा सुरु आहे. पण त्या सर्व आदेशांना हरताळ फासत आताच नवीन रुजू झालेले प्रांताधिकारी, महामार्ग प्राधिकरण खात्याचे मुख्य अधिकारी, तहशिलदार, ठेकेदार मिळून बायपासमधील शेतकऱ्यांना वैयक्तिक …

Read More »

आणि जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा श्वास झाला मोकळा!

बेळगाव : शहर परिसरात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे शाहुनगर येथील जोशी कॉलनीत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी केरकचर्‍यामुळे साठून राहिल्याने लोकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार अनिल बेनके आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पालिका कर्मचार्‍यांना बोलावून सूचना करण्यात आल्या. त्वरित साठून …

Read More »

इंधन दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल १०३ रुपयांवर, डिझेल ९५ रुपयांवर!

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दराने 103 रुपयांची तर डिझेल दराने 95 रुपयांची पातळी ओलांडली.तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली नव्हती. पण जागतिक …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा …

Read More »

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …

Read More »

मासेमारीस गेलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बेळगाव : मासेमारीसाठी गेलेल्या एका मुलाचा जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिनीतील विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना अनगोळ तलावाच्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नांव विकास संजू मोघेरा (वय 14 वर्षे, रा. अनगोळ) असे आहे. विकास हा आज सकाळी अनगोळ येथील तलावाच्या ठिकाणी मासे …

Read More »

चंदगड तालुक्यात संततधार

बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार …

Read More »