Wednesday , July 29 2026
Breaking News

बेळगाव

फेक न्यूज, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांचे निर्देश

  बेळगाव : सोशल मीडियावर खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्य किंवा व्हिडीओ टाकल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई करून योग्य ती कारवाई करावी, असे कडक निर्देश गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 20) शहरातील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली आणि सोशल नेटवर्क मॉनिटरिंग युनिट आणि कंट्रोल रूमची प्रत्यक्ष पाहणी करून …

Read More »

बिजगर्णीच्या ‘त्या’ प्रकरणातील पाच जणांना अटकपूर्व जामीन

  बेळगाव : बिजगर्णी येथे यावर्षी लक्ष्मी यात्रा भरविण्यात येणार आहे. त्यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीमध्ये मागील लक्ष्मी यात्रोत्सवाचा हिशेब मागितल्यानंतर वादावादी झाली होती. यल्लाप्पा बेळगावकर यांना मारहाण केली, अशी तक्रार बेळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये झाली. त्यानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामधील यापूर्वी एकाला जामीन मंजूर झाला. त्यानंतर …

Read More »

येळ्ळूर येथे बी. एल. कानशिडे यांना श्रद्धांजली

  येळ्ळूर : समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. बी. एल. कानशिडे यांचे (वय ८२) नुकतेच निधन झाले. त्याबद्दल समाज शिक्षण संस्था व महाराष्ट्र हायस्कूलतर्फे शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा लिला मेणसे होत्या. कै. बी. एल. कानशिडे यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मुख्याध्यापक बी. पी. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या दाव्यात साक्षी पुरावे घेण्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली; पण प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात मात्र होऊ शकली नाही, अशी खंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सीमाप्रश्नाच्या दाव्याचा महाराष्ट्राने गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी आग्रही …

Read More »

बालप्रतिभावंतांकडून मराठी साहित्याचा जागर

  बेळगाव : बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज बालप्रतिभावंतांकडून मराठी साहित्याचा जागर करण्यात आला. निमित्त होते, वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे. वाचनाची आवड जोपासा, ज्ञानाच्या कक्षा वाढवा असे आवाहन संमेलनाचे उदघाटक उद्योजक एम. एन. राजगोळकर यांनी केले. बेळगावातील गोगटे रंगमंदिरात आज शनिवारी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बालसाहित्य संमेलनाचे …

Read More »

रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

  देसूर : रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. देसूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ आज शनिवारी दुपारी 12.15 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. भोमाणी चिमाजी नंद्याळकर (वय 60, राहणार – देसुर-बेळगाव) असे रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यापासून भोमाणी चिमाजी …

Read More »

वडगाव येथील महिला मुलीसह बेपत्ता!

  बेळगाव : यरमाळ रोड, वडगाव, येथील एक महिला आपल्या मुलीसह गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्या मायलेकीचा शोध घेत आहेत. वैशाली सचिन किचाडे (वय 36), मुलगी सिद्धी (वय 12) दोघेही राहणार यरमाळ रोड, वडगाव, अशी त्यांची नावे आहेत. …

Read More »

हिवाळी अधिवेशन काळात कडक बंदोबस्त ठेवा; आर. हितेंद्र यांच्या सूचना

    बेळगाव : दसरा, दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात बेळगावात हिवाळी अधिवेशन होत आहे. हिवाळी अधिवेशन चार डिसेंबर ते 15 पर्यंत चालणार आहे. अधिवेशनाची पूर्वतयारी, अधिवेशन काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देत, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र यांनी घेतला. आर. हितेंद्र कालपासून दोन दिवसांच्या …

Read More »

गदगजवळ झालेल्या कार अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू

  बेळगाव : कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा जण जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची नावे सिद्धय्या पाटील आणि बाबू तारीहाळ …

Read More »

बेळगावात शिवसेनेतर्फे ११ व्या स्मृतिदिनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  बेळगाव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनी बेळगाव खडेबाजार, कृष्णज्योती अपार्टमेंटमधील कार्यालयात आज शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’परत या, परत या, बाळासाहेब …

Read More »