Saturday , June 6 2026
Breaking News

श्रीमंगाई देवीच्या यात्रेसाठी वडगावनगरी सज्ज!

Spread the love

 

बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव येथील ग्रामदैवत श्रीमंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलै पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेला वडगावसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते.
दरवर्षी वडगाव येथील मंगाई यात्रेला वडगावसह बेळगाव परिसरातील तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी यात्रेला उपस्थित राहतात, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने श्रीमंगाई देवी मंदिर परिसरात तसेच मुख्य रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याचप्रमाणे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून स्वच्छतेच्या कामाबरोबर मुख्यमार्गांसह विविध गल्लीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम देखील हाती घेतले आहे. बंद पडलेले पथदीप देखील चालू करण्यात आले आहे.

दरवर्षी श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवात पावसाची हजेरी असते त्यामुळे मंदिर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. मात्र यावर्षी मंदिर परिसरात पेव्हर्स बसवण्यात आले असल्यामुळे भाविकांची चांगली सोय होणार आहे. मंदिर आणि परिसरात ठीक ठिकाणी पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुलांसाठी विविध खेळाचे पाळणे तसेच अन्य विविध खेळ आणि मनोरंजनाची साधने यात्रास्थळी दाखल झाली आहेत. मंगाई देवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण वडगावनगरी श्री मंगाई देवी यात्रा भक्तीभावाने साजरी करण्यास सज्ज झाली असून सर्वत्र यात्रेची लगबग दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *