Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

तिसऱ्या उड्डाणपुलाला पुनीत राजकुमार यांचे नाव देण्याबाबत चर्चा

  बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राज्योत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव शिस्तबद्ध आणि भव्यपणे साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. आज सोमवारी (दि. 10) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वतयारीच्या प्राथमिक बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. या …

Read More »

तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचे उद्घाटन 12 ऑक्टोबर रोजी

बेळगाव : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा वेळ उपलब्ध न झाल्यामुळे अखेर खासदार मंगल अंगडी यांच्याहस्ते बुधवार 12 ऑक्टोबर रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. याचे उद्घाटन करण्यात येणार असून, यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार अभय पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी …

Read More »

श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सोसायटीच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

  बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, उचगांव या सोसायटीच्यावतीने विविध पुरस्कार व सत्कार सोहळा शंकर-पार्वती कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत सोसायटीचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. अनिल पावशे यांनी केले. कार्यक्रमात साहित्य भूषण पुरस्कार अ‍ॅड. नितीन धोंडीबा आनंदचे …

Read More »

मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात हलगा ग्राम पंचायतीस निवेदन

  बेळगाव : हलगा येथील महाराष्ट्र एकीकरण महाराष्ट्र समिती व मराठी भाषिकांच्या वतीने ग्रामपंचायतला सर्व परिपत्रके, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत द्यावीत, असे निवेदन सोमवार दिनांक 10 रोजी ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ फर्नांडिस यांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी मनोहर संताजी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्के पेक्षा जास्त आहेत, …

Read More »

हुक्केरीजवळ कार आणि दुचाकी अपघातात आई व मुलगा जागीच ठार

  हुक्केरी : हुक्केरीजवळ तीन कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला. भारती अनिल पुजेरी (28) आणि वेदांत अनिल पुजेरी (6) अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालवणाऱ्या अनिल शंकरय्या पुजेरी (वय 35) आणि कारमधून प्रवास करणारा किरण लोकाया सालीमठ (28) हे जखमी झाले. …

Read More »

सृष्टी जाधवची राज्यस्तरीय निवड

  बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याकरिता दिनांक 10 व 11 ऑक्टोंबरला गाडीकोप शिवमोगा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता सृष्टी जाधव प्रतिनिधित्व करणार आहे. सृष्टी जाधव ही जीएसएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे, क्रीडा …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किणेकर …

Read More »

जितोच्या अध्यक्षपदी मुकेश पोरवाल यांची निवड

  बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो बेळगाव विभागाच्या नूतन अध्यक्षपदी (chairman) मुकेश पोरवाल यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष वीरधवल उपाध्ये, उपाध्यक्ष प्रवीण सामसुखा, सरचिटणीसपदी नितीन पोरवाल, चिटणीसपदी अशोक कटारिया, कोषाध्यक्ष आकाश पाटील, सहकोषाध्यक्ष विजय पाटील, आणि संचालक मंडळचे सदस्य हर्षवर्धन इंचल, विक्रम जैन आणि गौतम पाटील यांची …

Read More »

रामायणाची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना : आमदार अनिल बेनके

  बेळगाव : वाल्मिकी महर्षी हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते. रामायण लिहून संपूर्ण जगाला महाकाव्याची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना जाते, असे प्रतिपादन आमदार अनिल बेनके यांनी महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात बोलताना केले. कुमार गंधर्व मंदिर येथे आज रविवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर महामंडळ आणि जिल्हा अनुसूचित …

Read More »

मुख्याध्यापक रविंद्र तरळे नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंटकडून सन्मानीत

  बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व भारत सेवा समिती संचलित हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मोहन तरळे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती, चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य …

Read More »