बेळगाव : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप करून समन्स पाठविण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने चालविली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्थळांवर शुक्रवारी 22 जुलै रोजी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
बेळगाव : विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार ता. २२ रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
Read More »माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची : प्रा आनंद मेणसे
पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांना पाचव्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन बेळगाव : मोबाईलच्या जमान्यात पुस्तके वाचण्याची संस्कृती कमी होत असताना वाचनाची सवय प्रत्येकाला दिशादर्शकाचे कार्य करते. माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्यातील उणीव भरून काढण्यासाठी पुस्तके वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले. येथील एल्गार सामाजिक साहित्य …
Read More »केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणाविरोधात बेळगावात निदर्शने
बेळगाव : दूध, दही, ताक यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात बेळगावमध्ये एसडीपीआय संघटनेने निदर्शने केली. गरिबांच्या जगण्यावर केंद्रातील भाजप सरकारने प्रहार केल्याचा आरोप करत एसडीपीआय संघटनेच्यावतीने बेळगावमध्ये निदर्शने करत आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात एसडीपीआय संघटनेच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दरवाढीच्या …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीएसएनएल निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी देशभरातील सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही आज आंदोलन करण्यात आले. पेन्शनमध्ये वाढ करावी, वैद्यकीय खर्च द्यावा, आयडीएचा परतावा द्यावा आणि पेन्शनवर संसदीय मंडळाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी या चार मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एआयबीडीपी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेळगावातील कॅम्पमधील …
Read More »नेसरगी पोलिसांकडून अन्नभाग्य योजनेचा तांदूळ जप्त
बेळगाव : नेसरगी पोलिसांनी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ बेकायदेशीरपणे वाहून नेणारी एक गाडी पकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त केला आहे. बोलेरो पिकअप वाहनातून बेकायदेशीर रेशनच्या तांदूळाची वाहतूक होत असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून नेसरगी पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तांदूळ जप्त केला. वाहनासह 76,076 रुपये किमतीचा 71 पोती …
Read More »येळ्ळूर येथील जलजीवन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव : येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन 24/7 पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येळळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली. यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळळूरपर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, प्रेशर …
Read More »अन्नधान्यवर लादण्यात आलेल्या जीएसटीचा ‘आप’कडून निषेध
बेळगाव : अन्नधान्यावर लादण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधार्थ आज बेळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागातर्फे आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, दूध, ताक, दही यावर लादण्यात आलेल्या जीएसटीचा निषेध करत सदर निर्णय सरकारने मागे घ्यावा, …
Read More »बिम्स रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालक दगावल्याचा पालकांचा आरोप बेळगाव : बिम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिम्स रूग्णालयासमोर डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला. होन्निहाळ गावात राहणार्या सुनीता यांना आठ दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान, कुटुंबीय …
Read More »बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस साजरा
बेळगाव : बेळगाव येथील बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम रामदेव गल्लीतील बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनियर ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश कुरेन्नावर सिनियर ब्रँच मॅनेजर, प्रदीप शिंदे, बाळा बाळतीमल्हा, आनंद सुगटे, सौ. दुर्गा चौगुले, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta