Monday , September 21 2026
Breaking News

बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : सांबरेकर गल्ली, येळ्ळूर येथील अमर शिवसेना युवक मंडळातर्फे आयोजित माणसाने बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत नुकतीच उत्साहात पार पडली.

सदर शर्यतीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल उपस्थित होते. विशेष म्हणजे गोरल यांनी स्वतः बैलगाडी ओढून शर्यतीचे उद्घाटन केले. आपल्या समायोजित उद्घाटन पर भाषणात रमेश गोरल यांनी बैलगाडी ओढणे यासारख्या देशी खेळांचे महत्त्व विशद करून शर्यतीत भाग घेतलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अमर शिवसेना युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावातील क्रीडाप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *