Monday , September 21 2026
Breaking News

गर्लगुंजी येथे उद्या भव्य कबड्डी स्पर्धा

Spread the love

 

खानापूर : गर्लगुंजी येथे रविवार दिनांक 30/10/2022 रोजी माऊली ग्रुप गर्लगुंजीतर्फे कर्नाटक राज्य मर्यादित भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गर्लगुंजी ग्रामस्थांनी खानापूर तालुक्यातील जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती “एकी की बेकी” या वादात अडकली असताना गर्लगुंजी ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्ष्याच्या नेत्यांच्या बक्षीसरूपी आमिषाला बळी न पडता समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आमंत्रित केले आहे.
सध्या तालुक्यात दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कब्बडी, खो-खो, क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून राष्ट्रीय पक्ष सढळ हस्ते बक्षीस रुपी देणग्या देत आहेत. मात्र गर्लगुंजी ग्रामस्थांनी मात्र समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आमंत्रित केले आहे. या व्यासपीठावर विखुरलेली खानापूर तालुका म. ए. समिती गट तट विसरून एकत्र येईल का? असा प्रश्न सामान्य समितीप्रेमी नागरिकांना पडला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *