बेळगाव : वडगाव कारभार गल्ली येथील लक्ष्मी पारकर यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव परिसरात सध्या पावसाचा जोर सुरू आहे. अतिपावसामुळे कारभार गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली. याची माहिती श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांना देण्यात आली. तातडीने कोंडुस्कर यांनी घटनास्थळी भेट …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायत हद्दीतील अवचारहट्टी येथे विद्युत्त अदालत संपन्न
बेळगाव : शनिवार दि. 16/07/2022 रोजी सकाळी हेस्कॉमच्या वतीने विद्युत्त अदालत संपन्न झाली. यावेळी अवचारहट्टी गावामधील विजेच्या संदर्भात गावातील नागरिकांनी व येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांनी गावामधील विविध विद्युत्त समस्या मंडल्या. शेतातील विद्युत्त खांब व्यवस्थित करून देणे, विजेचे जूने खांब बदलून नवीन खांब बसविणे, गावातील खासगी जागेत असलेले टीसी (ट्रान्सफार्मर) …
Read More »मराठा विकास महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या : राष्ट्रवादी काँग्रेस
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठा विकास महामंडळाचे शिवाजी महाराज मराठा समाज विकास महामंडळ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव येथे जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. कर्नाटक सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, मराठा विकास महामंडळासाठी सरकारने …
Read More »उज्ज्वलनगर परिसर जलमय!
बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागून असलेल्या उज्ज्वल नगरमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गासह सर्व्हिस रोडवर वाहणारे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी स्थानिक आमदार अनिल बेनके यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. …
Read More »भडकल गल्ली येथे भाग्यलक्ष्मी बॉण्ड वितरण
बेळगाव : दिनांक 16 जुलै 2022 रोजी जिल्हा पंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, बाल विकास प्रकल्प, बेळगांव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यलक्ष्मी बॉण्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाग्यलक्ष्मी बॉण्ड आपल्या जवळच्या केंद्रातच उपलब्ध व्हावी जेणेकरुन लाभार्थ्यांची धावपळ होणार नाही तसेच फॉर्म भरताना …
Read More »जीएसटीच्या निषेधार्थ बेळगावात व्यापार्यांचा बंद
बेळगाव : केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर 5% वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लादल्याचा निषेधार्थ बेळगावातील व्यापार्यांनी आज रविवारपेठसह बाजारपेठ बंद ठेवून हरताळ पाळला. आज बेळगावची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठेतील सर्व व्यापार्यांनी एक दिवस संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून जीएसटी लादल्याचा निषेध केला. अलीकडेच केंद्र सरकारने अन्नधान्य आणि डाळींवर …
Read More »सौंदत्ती तालुक्यात विजेचा धक्का लागून दोन शेतकर्यांचा जागीच मृत्यू
सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हिरूर गावात आज शनिवारी विजेचा धक्का लागून दोन शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला. फकिराप्पा सिद्धप्पा चंदरगी (54) आणि महादेवा दुर्गाप्पा मैत्री (40) अशी मृत्यू झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. हे दोघेही ऊसाच्या शेतात काम करत असताना पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला. सौंदत्ती पोलीस ठाण्याचे …
Read More »रेडक्रॉसकडून मराठा सेंटरला 57 हजार फेसमास्क
बेळगाव : कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेतर्फे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, जेएल विंग आणि मिलिटरी हॉस्पिटल यांना एकूण 57 हजार इम्पोर्टेड पुनर्वापर करता येणारे फेसमास्क आज देणगी दाखल देण्यात आले. भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेतील रेड क्रॉस राज्य व्यवस्थापन …
Read More »सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने नागरिक संतप्त
बेळगाव : बेळगावमधील सदाशिवनगर भागातील क्रॉसवरील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत असतो. यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सदाशिवनगरच्या शेवटच्या क्रॉसवर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची नादुरुस्ती कायमची डोकेदुखी बनली आहे. पावसाळ्यात देखील या भागातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीतरीत्या मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात …
Read More »राष्ट्रध्वज पॉलिस्टरचा बनविण्याच्या निर्णयास विरोध करण्याची गरज
बेळगाव : तिरंगा ध्वज हा केवळ काठी व कापडाचा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. लाखो भारतीयांच्या त्यागातून त्याची निर्मिती झाली असून तो देशाची शान व अभिमान आहे. यासाठी तो पॉलिस्टरचा बनविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनतेने विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन गांधीवादी अशोकभाई देशपांडे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta