बेळगाव : मागील विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव पत्करलेल्या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा जोमात उतरणार असून कागवाड, गोकाक, रामदुर्ग, सौन्दत्ती, अथणी, कुडची आणि रायबाग, बेळगाव उत्तर आणि आरभावी मतदारसंघात लिंगायत उमेदवार देण्याचा विचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत आहेत. 2023 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 मतदारसंघासाठी काँग्रेसने आतापासूनच संपर्क वाढवला आहे. …
Read More »युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
बेळगाव : सीमा लढ्यात युवकांनी झोकून देऊन काम करण्यास सज्ज झाले पाहिजे. सीमा चळवळीत युवा वर्ग सामील तर होतोच आहे तेही समाज माध्यमातून चांगली जागृती करताना दिसत आहेत हि लढ्याच्या दृष्टीकोनातून जमेची बाजू आहे. संतोष मंडलिक हा युवा आघाडीच्या माध्यमातून चांगले कार्य करीत आहे. आज त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंद …
Read More »साईज्योती सेवा संघातर्फे वृक्षारोपण
बेळगाव : आज व्हॅक्सिन डेपो येथे साईज्योती सेवा संघातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. साईज्योती संस्थेच्या संचालिका ज्योती निलजकर म्हणाल्या की, आयुष्यात प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, झाडे लावणे हे जितके महत्वाचे त्याचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे. यावेळी वॉर्ड क्र. 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण, संघाच्या उपसंचालिका ज्योती बाके, सेक्रेटरी …
Read More »राज्यस्तरीय चर्म शिल्पी पुरस्काराने बेळगावचे संतोष होंगल सन्मानित
बेळगाव : राज्यस्तरीय चर्म हस्त कौशल्य मेळावा आणि चर्म कौशल्य वस्तू प्रदर्शनात बेळगावच्या चर्मकार समाजातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि चर्म कौशल्य वस्तू निर्माते संतोष होंगल यांना चर्म शिल्पी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 30 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गुणात्मक आणि उत्कृष्ट डिझाईनची …
Read More »लाखो रुपयांचा चुना लावून फरारी ठकसेनाला बेळगाव पोलिसांकडून अटक
बेळगाव : बेळगावातील होलसेल भाजी व्यापार्यांना सिमेंट आणि लोखंडाच्या धंद्यात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेनाला बेळगाव पोलिसांनी नेपाळला जाऊन माहिती मिळवून बेड्या ठोकल्या आहेत. एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने एका बड्या ठकसेनाला बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. बेळगावातील घाऊक भाजी …
Read More »“डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने डॉ. सुरेश रायकर यांचा सन्मान
बेळगाव : “डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने मराठा समाजाचे नेते तसेच कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव व विमल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बेळगाव येथील प्रतिष्ठित डॉ. सुरेश रायकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रायकर यांनी मागील 41 वर्षांपासून बेळगाव येथे रुग्णसेवा केली आहे. बेळगाव शहरात ते एक नावाजलेले …
Read More »मजगावातील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक
बेळगाव : बेळगावातील मजगाव येथील युवकाच्या उद्यमबाग येथे झालेल्या खूनप्रकरणी ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसांपूर्वी मजगाव आंबेडकर गल्लीतील रहिवासी यल्लेश शिवाजी कोलकार या २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून उद्यमबाग पोलिसांनी …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील शिवापुर येथे घरात आढळला सांगाडा
बेळगाव : झोपलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा सांगाडा आढळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील शिवापूर गावातील एका घरात एका व्यक्तीचा झोपलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे शिवपुरात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच प्रकाश तवनप्पा मुरगुंडी याचा तो …
Read More »पत्रकारितेमध्ये करिअरच्या नव्या संधी उपलब्ध
बेळगाव : बदलत्या युगामध्ये सर्वच व्यवसायांचे स्वरूप बदलते आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा देखील समावेश आहे. नव्या युगामध्ये पत्रकारितेची नवी आधुनिक प्रणाली विकसित होत आहे. त्यामुळे नव्या पिढीला पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन स्मार्टन्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी केले. येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मराठी विभागातर्फे आयोजित पत्रकारिता …
Read More »राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्यावतीने डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार
बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी डॉ. अनगोळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन डॉक्टरीपेशा सांभाळत करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta