बेळगाव : कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला. कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर सिंग आणि सन्माननीय अतिथी म्हणून आरएमएस बेळगावच्या एडम …
Read More »शरीरसौष्ठव चषक अनावरण सोहळा संपन्न
बेळगाव : भीम वाल्मिकी युव संघटनेच्या वतीने कलमेश्वर बसवेश्वर श्री 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी बसवन कुडची येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 26 मार्च रोजी बसवन कुडची येथील मंगल कार्यालयात या स्पर्धेचे चषक अनावरण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …
Read More »ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण
बेळगाव : ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी पार पडला. ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आज सकाळी विविध प्रकारच्या झाडांची 100 हून अधिक रोपे लावण्यात आली. चव्हाट गल्ली पंच …
Read More »भग्न प्रतिमा संकलनाचा लोकसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम!
बेळगाव : सुळेभावी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवी देवस्थान आणि श्री क्षेत्र कलमेश्वर मंदिर परिसरात इतरत्र टाकण्यात आलेल्या देव-देवतांच्या भग्न प्रतिमा विधीवत दहन करण्यासाठी संकलित करण्याचा स्तुत्य उपक्रम सर्व लोकसेवा फाऊंडेशन बेळगावचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांनी आज आपल्या फाऊंडेशनतर्फे राबविला. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणार्या …
Read More »श्री दुर्गा सेवा संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगावच्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
बेळगाव : श्री दुर्गा सेवा संघटना बेळगाव यांच्यावतीने बेळगावच्या भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे या किल्ल्याला आता चांगले भवितव्य मिळणार आहे. बेळगाव परिसरातील अनेक शिवभक्त या संघटनेमध्ये सामील असून या संघटनेच्या वतीने अनेक किल्ल्यावर हे अभियान यापूर्वी राबविण्यात आले आहे. आता या किल्ल्यावरील झाडेझुडपे, …
Read More »बेळगावचे संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार 2022 प्रदान
बेळगाव : सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात बेळगावचे युवा संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना ‘पंडीत चिदानंद जाधव युवा गंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये अकरा हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉ. श्रीकांत …
Read More »मच्छे शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली कोविड लस
आरोग्याची काळजी घेण्याचे मच्छे पालिका मुख्याधिकारी शिवकुमार यांनी केले विद्यार्थ्यांना आवाहन बेळगाव : मच्छे येथील सरकारी आदर्श मराठी आणि कन्नड शाळेत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. मच्छे नगरपालिका मुख्य अधिकारी शिवकुमार यांनी दीपप्रज्वलित करून लसीकरण अभियानाला चालना दिली. मागील …
Read More »उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री राजेश तुडयेकर यांना आज मुंबई येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील गऊ भारत भारती गोरक्षक सेवा ट्रस्टतर्फे आज शनिवारी सकाळी सातवा वर्धापन दिन …
Read More »वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
बेळगाव : बेळगाव शहर परिसराला आज दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या तर कांही रस्त्यांवर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले. बेळगाव शहर परिसरासह तालुक्याला आज शनिवारी दुपारी …
Read More »मॉडेल सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड पीयू कॉलेज आणि अर्थ कोटा करियर अकॅडमीमधील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे एसीपी एन. एस. बरमनी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर, संचालक अमित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta