Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स ग्रुप मेनतर्फे पर्यावरण दिन साजरा

Spread the love

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त रोप लागवड करण्यात आली. मंडोळी येथील डोंगरात वसलेल्या स्वयंभू बसवाण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत रोपे लावण्यात आली. जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मंडोळी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, सारंग राघोचे उपस्थित होते . हिरेमठ यांनी, सजीव सृष्टीचे जगणे सुंदर आणि समृद्ध व्हावयाचे असेल तर प्रत्येक मनुष्याने पर्यावरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. निदान आपल्या घरासमोर एक तरी झाड लावून त्याचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे सांगितले. संचालक एस. सुरेश यांचेही भाषण झाले. जायंट्सचे उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, अविनाश पाटील, संचालक विश्वास पवार, पांडुरंग पालेकर, आनंद कुलकर्णी, धीरज मरळीहल्ली, पद्मप्रसाद हुली आदींसह मंडोळी, चन्नमानगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते. सचिव मुकुंद महागावकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *