Sunday , March 8 2026
Breaking News

बेळगाव

कडोलीतील शेतकर्‍याची आत्महत्या

बेळगाव : कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लाप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून …

Read More »

विधान परिषदेसाठी हनुमंत निरानी यांचा अर्ज दाखल

बेळगाव : वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज या निवडणुकीसाठी आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमंत निरानी याआधी एमएलसी होते. आता दुसऱ्यांदा …

Read More »

जैनधर्म तत्वज्ञान जीवनाला दिशादायक

युवा नेते श्रीनिवास पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अहिंंसा परमोधर्म यासह जैन धर्मातील तत्वज्ञान मानवी आयुष्याला दिशा देणारे आहे, असे मत भाजपचे युवा नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने आयोजित केलेल्या पंचकल्याण महोत्सवात श्रीनिवास पाटील सहभागी झाले होते. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या ब्रिजसाठी निवेदन

बेळगाव : बायपास रस्त्याचे काम जोमाने सुरु असून येळ्ळूर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची व रुंदी वाढून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरून जाणारे ब्रिजची उंची ही 4 मीटर (13 फूट) आहे व रुंदी 12 मीटर (39 फूट) आहे. हे समजताच येळ्ळूर ग्राम पंचायतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल रहदारी …

Read More »

वाढीव आरक्षणासाठी एससीएसटी समाजाचे आंदोलन

बेळगाव : एससीएसटी समाजाला वाढीव आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटक स्वाभिमानी अनुसूचित जाती जमाती आरक्षण वाढ आंदोलक क्रिया समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते. येत्या 15 दिवसात वाढीव आरक्षण न मिल्यास सरकार पडेल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. एससीएसटी समाजाला 3 टक्के आरक्षण देण्यात येत आहे. हे आरक्षण 7.5 टक्के इतके …

Read More »

मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या भाजीपाल्यासह रब्बीचेही नुकसान

बेळगाव : गेल्यावर्षी खरिप हंगाम लांबल्याने रब्बीची पेरणी पुढे गेली त्यात खराब हवामानाने तसेच अवकाळी पावसाने रब्बी पीकंही गेली. या भागातील प्रसिद्ध मसूर पीकं तर सपशेल गेली त्यात खरबूस, काकडी, दोडकी इतर वेलवर्गीय पीकंही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. अनेक शेतकर्‍यांनी तिसरी पीकं कोथिंबीर, मेथी, लालभाजी, भेंडी, कोबिज, टोमॅटो, बीट, …

Read More »

टिम इंडियाच्या कोचिंग कॅम्पकरिता बेळगाव जिल्ह्यातील 3 स्केटिंगपटूंची निवड

बेळगाव : पंचकुल आणि पटियाला (पंजाब) येथे दिनांक 15 ते 30 जून 2022 या दरम्यान होणार्‍या जागतिक स्केट गेम्स 2022 या स्केटिंग स्पर्धेकरिता रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने स्केटिंगपटूंसाठी शिबिर आणि निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित आणि भक्ती हिंडलगेकर या तिघां इनलाईन …

Read More »

मिरची उत्पादक शेतकर्‍यांनी योग्य दरासाठी केले आंदोलन

बेळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल खानापूर आणि …

Read More »

मिनी ऑलम्पिकमध्ये बेळगावच्या ज्युडोपटूंचे सुयश

बेळगाव : युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 2 र्‍या मिनी ऑलिंपिक गेम्स -2022 मधील ज्युडो क्रीडा प्रकारात 11 सुवर्णपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई करत स्पृहणीय यश संपादन केले. क्रीडा खात्यातर्फे बेंगलोर येथे गेल्या 18 व 19 मे रोजी कर्नाटक राज्यस्तरीय …

Read More »

पावसामुळे झालेल्या समस्यांचा आमदार अभय पाटील यांनी घेतला आढावा

बेळगाव : बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे …

Read More »