Saturday , June 6 2026
Breaking News

टिम इंडियाच्या कोचिंग कॅम्पकरिता बेळगाव जिल्ह्यातील 3 स्केटिंगपटूंची निवड

Spread the love

बेळगाव : पंचकुल आणि पटियाला (पंजाब) येथे दिनांक 15 ते 30 जून 2022 या दरम्यान होणार्‍या जागतिक स्केट गेम्स 2022 या स्केटिंग स्पर्धेकरिता रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने स्केटिंगपटूंसाठी शिबिर आणि निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित आणि भक्ती हिंडलगेकर या तिघां इनलाईन हॉकी स्केटिंगपटूंची टिम इंडियाच्या कोचिंग कॅम्पकरिता निवड करण्यात आली आहे.
या अनुषंगाने निवड झालेल्या त्या तिघा स्केटिंगपटूंचा गोवावेस स्विमिंग पूल नजिकच्या स्केटिंग रिंकवर गौरव करण्यात आला. बेळगावचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विनोद बामणे, बसवराज कोरीशेट्टी, चोकसिंग पुरोहित, श्रीकांत मेंडके, श्रीमती मेंडके, श्रीमती लीना कोरीशेट्टी, श्रीमती बामणे, अमित मुगळी, महेश पुरोहित बरवा, देवराज पुरोहित पुराडा, दिनेश पुरोहित, वसंत, किंजल पुरोहित यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या स्केटिंगपटूंना सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंगपटू, पालक उपस्थित होते.
निवड झालेले हे स्केटिंगपटू केएलई सोसायटी संचालित लिंगराज महाविद्यालय स्केटिंग रिंक, गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंकआणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर मागील 9 वर्षांपासून सराव करत आहेत.
त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन सरचिटणीस इंदूधर सीताराम, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *