Sunday , September 20 2026
Breaking News

येळ्ळूर ग्राम पंचायतचे येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या ब्रिजसाठी निवेदन

Spread the love

बेळगाव : बायपास रस्त्याचे काम जोमाने सुरु असून येळ्ळूर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची व रुंदी वाढून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरून जाणारे ब्रिजची उंची ही 4 मीटर (13 फूट) आहे व रुंदी 12 मीटर (39 फूट) आहे. हे समजताच येळ्ळूर ग्राम पंचायतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल रहदारी संदर्भातील माहिती दिली व येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरून भरपूर प्रमाणात रहदारी आहे आणि ती पुढील काळात आणखीन वाढू शकते त्यामुळे रुंदी 12 मीटर (39 फूट) कमी होते त्यासाठी रूंदी 20 मीटर (65 फूट) पर्यंत वाढवावी व उंचीत सुध्दा वाढ करावी कारण येळ्ळूर खानापूर, देसुर, सुळगा, राजहंसगड, नंदीहळी येथील उसाचे ट्रॅक्टर, ऊसाचे ट्रक व सुक्या चाऱ्याचे ट्रॅक्टर येळ्ळूर वडगाव मार्गे जात असतात त्यासाठी ब्रिजची उंची ही 5.5 मीटर (18 फूट) वाढवावी असे निवेदन येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, राजू डोन्यांनावर, पिंटू चौगुले, कल्लापा मेलगे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट एम्प्लिमिटेशन युनिट धारवाड यांना व दि अशोका बिलकोन लिमिटेड याना कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मण चौगुले यांना निवेदन दिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *