बेळगाव : सालाबादप्रमाणे या वर्षीही शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असे म्हणतात की भगवान शंकराचा वास हा स्मशानात असतो, स्मशानातील भस्म शरीराला लावून भोळा शंकर स्मशानात राहत असे अश्या आख्यायिका प्रचलित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्रास हिंदू स्मशानात शिवालय असते. तसेच एक शिवालय शहापूर …
Read More »श्री बसवाण्णा महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त महापूजा
बेळगाव : शाहूनगरमधील बसवण्णा मंदिर कमिटीच्यावतीने महाशिवरात्री निमित महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी मंदिर कमिटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. या निमित्ताने सकाळी कमिटी अध्यक्ष श्रीकांत कदम, उपाध्यक्ष श्री. बामणे, श्री. अंगडी यांचेसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मंदिरात बसवण्णा महादेवाचे विधीवत पूजन करून महापूजा करण्यात आली. त्यानंतर कमिटीच्यावतीने नगरसेविका …
Read More »कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी
बेळगाव : आज महाशिवरात्री निमित्त बेळगावमधील दक्षिण काशी समजल्या जाणार्या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कपिलेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. बेळगांववासीयांचे आराध्य दैवत असलेले श्री कपिलेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शिवपौराणिक कथेनुसार महाशिवरात्री हा एक पवित्र …
Read More »बेळगावच्या स्केटिंगपटूंचे घवघवीत यश!
मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 बेळगाव : सांगली- मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत बेळगाव स्केटिंग संघाने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि दहा कांस्य अशी एकंदर चोवीस पदके पटकाविली. सांगली येथील वालमार्ट स्केटिंग ट्रॅकवर 27 …
Read More »बेळगुंदीत 3 मार्चपासून जंगी शर्यत
बेळगाव : बेळगुंदी येथील कलमेश्वर युवक व्यायाम मंडळाच्यावतीने एका बैलजोडीने गाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 3 रोजी दुपारी बारा वाजता शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. या शर्यत उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर राहणार आहेत. गाडा पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर व चंदगड तालुक्याचे नेते, …
Read More »नवहिंद क्रीडा केंद्राच्या “नवहिंद भवन” बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्या उद्धघाटन सोहळा
बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संस्थेतर्फे उभारलेल्या ‘नवहिंद भवन’ या बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 2 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव सायनेकर राहणार असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते भवनाचे उद्धघाटन केले जाणार …
Read More »बेळगाव रिंगरोडसह जिल्ह्यातील बारा राज्यमहामार्गांच्या कामांना मंजुरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा बेळगाव : बेळगाव शहरा सभोवतालच्या रिंगरोडची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. सदर रिंग रोड कामाबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील 12 राज्य महामार्ग कामांना आपण मंजुरी देत आहोत. लवकरच या नव्या रस्ते कामांना प्रारंभ होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आज सोमवारी बेळगावात …
Read More »जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्यांशी चांगले वागायला हवं : संभाजी यादव यांचे प्रतिपादन
बेळगाव : वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूरमधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले. साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्यांशी चांगलं बोलायला हवं, …
Read More »मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा
बेळगाव : मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास पात्र आहे. यामुळे केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित द्यावा अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. पत्रकार संघातर्फे रविवारी झालेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. सुरुवातीला ज्येष्ठ …
Read More »मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन साजरा
बेळगाव : मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला, रविवारी सायंकाळी उत्साहाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून जी. एस. एस. कॉलेजचे प्राध्यापक श्री. भरत ताेपिनकट्टी सर व प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराचे पॅरा कमांडो श्री. लक्ष्मण खांडेकर व शशी आंबेवाडीकर व अमेरिका येथे वास्तव्याला असणारे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta