Sunday , July 26 2026
Breaking News

कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

Spread the love


बेळगाव : जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवण गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. या शोभायात्रेत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
महिला मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाबाबत कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते झाली. रौप्यमहोत्सवानिमित्त मेहेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा यासह अनेक स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी खासदार मंगला अंगडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या महिला मंडळाने आजतागायत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले असून रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, कुटुंबातील सदस्य तसेच इतर महिला मान्यवरांनी मोठा सहभाग घेतला होता.
किरण जाधव यांनी दिल्या मंडळाला शुभेच्छा
दरम्यान, दैवज्ञ कालिका महिला मंडळाचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्यसचिव किरण जाधव यांनी सदिच्छा भेट देवून कालिका देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दैवज्ञ कालिका महिला मंडळाला शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *