Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

मराठी भाषिकांचा न्यायहक्कासाठी एल्गार!

भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकारी देण्याची म. ए. समितीची मागणी बेळगाव (वार्ता) : मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला विराट मोर्चा पोलिसांचा विरोध झुगारून यशस्वी करण्यात आला. …

Read More »

अखेर बुडाची बैठक संपन्न; विकासकामांवर झाली चर्चा

बेळगाव : बुडाच्या अध्यक्षपदावरून गुळाप्पा होसमनी यांची उचलबांगडी झाल्यानंतर अखेर आज सोमवारी नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बुडा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. बुडाचे माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी आणि स्थानिक भाजप आमदारांमधील वितुष्टामुळे यापूर्वी बुडाने बोलाविलेल्या दोन बैठका कोरम अभावी रद्द करून …

Read More »

पडद्याआड समाजसेवकांच्या सत्काराबाबत सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन आवाहन

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाचा प्रतिकूल काळात गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना दिलासा मिळवून देणार्‍या मात्र अद्याप प्रसिद्धीपासून दूर पडद्याआड असलेल्या सेवाभावी निस्वार्थ कार्यकर्त्यांचा शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याद्वारे त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच यासाठी जनतेने आपल्या भागातील संबंधित व्यक्तीच्या नांवाची शिफारस करावी, …

Read More »

असहाय्य वृद्धेला दिला मदतीचा हात!

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याकडेला गेल्या चार दिवसांपासून असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या एका वृद्धेला तेथील ऑटोरिक्षा चालकांनी हेल्प फॉर नीडीच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली. बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर रस्त्याशेजारी गेल्या चार दिवसापासून एक वृद्ध महिला अंगावरील जीर्ण कपड्यानिशी असहाय अवस्थेत पडून होती. सदर …

Read More »

बेळगावात रंगणार कीर्तन सोहळा : इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठरणार पर्वणी

आज रोवण्यात आली शामियान्याची मुहूर्तमेढ बेळगाव : श्री हरी विठ्ठल रुक्मिणी अभिवृद्धी वारकरी सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आदर्श नगर, वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर मैदानावर पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पारायण आणि कीर्तन सोहळा स्वामी यांची मुहूर्तमेढ नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे …

Read More »

नवहिंद पतसंस्थेला 91 लाखांचा नफा

सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; सभासदांना 12 टक्के लाभांश येळ्ळूर : नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात 91 लाख 68 हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येईल, अशी माहिती चेअरमन उदय जाधव यांनी 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली. जाधव पुढे म्हणाले, संस्थेकडे 266 कोटी रुपयांचे …

Read More »

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

बेळगाव : आजपासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना सुरुवात झाली असून यानिमित्ताने आज बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी आणि कन्नड शाळेमध्ये भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नुकतेच सहावी ते दहावी पर्यंतच्या वर्गांना …

Read More »

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन

बेळगाव (वार्ता) : विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सध्या शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना ताटकळत …

Read More »

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्या अत्याचारांना रोखण्याकरिता भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले. बांगलादेशमध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत. त्यांची संपूर्ण माहिती पुढे येत नाही. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या जी माहिती …

Read More »

बुडा बैठक यशस्वी न केल्यास तीव्र आंदोलन

बेळगाव : कणबर्गी निवासी योजनेच्या अंमलबजावणीसह रखडलेली विविध विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी बुडाच्या येत्या दि. 25 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीस शहराच्या दोन्ही आमदारांसह सर्व सदस्यांनी उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरातील सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्यावतीने …

Read More »