Sunday , September 20 2026
Breaking News

मच्छे शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली कोविड लस

Spread the love

आरोग्याची काळजी घेण्याचे मच्छे पालिका मुख्याधिकारी शिवकुमार यांनी केले विद्यार्थ्यांना आवाहन

बेळगाव : मच्छे येथील सरकारी आदर्श मराठी आणि कन्नड शाळेत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना कोविड लस देण्यात आली.
मच्छे नगरपालिका मुख्य अधिकारी शिवकुमार यांनी दीपप्रज्वलित करून लसीकरण अभियानाला चालना दिली.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी, शक्यतो शासकीय नियमांचे पालन करावे, असे शिवकुमार यावेळी बोलताना म्हणाले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल गेमसारख्या घातक खेळापासून दूर राहून अभ्यास करावा, मैदानी खेळ खेळून शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवावे, तसेच गुणात्मक शिक्षण घेऊन शाळा आणि पालकांचे नाव लौकिक करावे, असेही, शिवकुमार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
याप्रसंगी आरोग्य खात्याचे कर्मचारी तसेच जी. आय. तावरी, देसाई, ग्रामपंचायत माजी सदस्य गणपत जाधव आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *