Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

पंडित नेहरू महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान संपन्न

बेळगाव (वार्ता) : शहापूर अळवण गल्ली येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. स्वच्छता अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये नगरसेवक रवी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात आले. प्रारंभी संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळ्ळी यांनी रवी साळुंखे, संजय पाटील, देमट्टी, हेल्थ इन्स्पेक्टर …

Read More »

जिल्हाधिकार्‍यांची विनंती समिती नेत्यांनी फेटाळली

25 रोजीचा मोर्चा होणारच बेळगाव (वार्ता) : कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रके देण्याबरोबरच फलकांवरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज पुनश्च जिल्हाधिकार्‍यांकडे केली. तसेच 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आजच्या बैठकीस …

Read More »

वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये 1 लाख वातींच्या दिव्यांचा दीपोत्सव

बेळगाव : कार्तिक मासानिमित्त विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये 1 लाख वातींच्या दिव्यांचा दीपोत्सव कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. विष्णू गल्ली वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये श्री गिरिवर दास यांच्या पुढाकाराने सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. सध्या कार्तिक मासानिमित्त या मंदिरात दीपोत्सव साजरा केला …

Read More »

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून येळ्ळूर येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन उत्साहात

बेळगाव : युवजन सबलीकरण खात्याच्या योजनेअंतर्गत जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या निधीतून येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे बांधण्यात आलेल्या नव्या व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सदर उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि. पं. सदस्य रमेश परशराम गोरल हे होते. यावेळी प्रमुख …

Read More »

येळ्ळूरमधून 25 ऑक्टोबरच्या मोर्चाला पाठिंबा

येळ्ळूर : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. शांताराम कुगजी होते. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. मोर्चाचा उद्देश सीमाभागात मराठी माणसाची व मराठी संस्कृतीची होणारी गळपेची. महानगरपालिकेवरील लाल-पिवळा अनाधिकृत ध्वज त्वरीत हटवावा यासाठी महामोर्चा काढण्यात …

Read More »

रोटरी परिवारातर्फे मिळणार मोफत कृत्रिम अवयव

बेळगाव : रोटरी परिवार, बेळगाव असोसिएशन साधू वासवानी मिशन पुणे आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्यावतीने बेळगावमध्ये रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर आयोजित केले गेले आहे. सदर शिबिर विजया ऑर्थो आणि ट्रामा सेंटर अयोध्या नगर येथे पार …

Read More »

काळादिन मोर्चात बेळगाव शिवसेनेचाही सहभाग

बेळगाव : मराठी भाषिकांवर अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होऊन संपूर्ण पाठिंबा दर्शवण्याबरोबरच 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या फेरीत ताकदीने उतरण्याचा निर्णय बेळगाव शिवसेनेने जाहीर केला आहे. शिवसेनने (सीमाभाग -बेळगाव) आज गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त निर्णय जाहीर केला …

Read More »

कुद्रेमानी समितीचा विराट मोर्चाला जाहिर पाठिंबा

कुद्रेमानी : मराठी भाषा, संस्कृती जतन करून स्वाभिमानाने अस्मिता टिकविण्यासाठी गेली ६५ वर्ष सीमाबांधव सीमालढा लढतो आहे. मराठी भाषिकांना अल्पसंख्यांक आयोगाने हक्क देणे, मराठीत कागदपत्रे मिळावीत अशा विविध मागण्याकरिता हा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन सीमाकवी रवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना …

Read More »

१९८३ मराठा मंडळ हायस्कूलच्या माजी विद्यार्थांचा स्नेहमेळावा आयोजन बैठक

१४ नोव्हेंबर रोजी स्नेह ऋणानुबंध मेळावा बेळगाव (रवी पाटील) : बेळगाव येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सन १९८३ माजी विद्यार्थ्यांची आयोजन बैठक मिलेनियम गार्डनच्या बाजूला डी. एस. जाधव यांच्या कार्यालयात डी. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी या बैठकीत रविवार दि. १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वा. ईफा हॉटेल क्लब …

Read More »

उद्या तालुका समितीची बैठक

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकटीसाठी आणि काळा दिन आणि 25 रोजी मोर्चा संबंधी विचार विनिमय करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होणार आहे. मंगळवारी 19 रोजी दुपारी 2 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका म.ए. समिती …

Read More »