Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकारीपदी मनोज कुमार मीना

बंगळूरू : राज्याचे नुतन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून 2003 च्या बॅचचे आयआयएस अधिकारी मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपला होता. त्यामुळे रिक्त जागेवर मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी मनोजकुमार …

Read More »

बेळगावात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

  विधानसभाध्यक्ष हेगडे यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने अखेर डिसेंबरमध्ये बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ही माहिती दिली. विधानसभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष हेगडे कागेरी म्हणाले की, हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होईल. बेळगावात अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच या …

Read More »

मोदी, शहा, संघाने माझ्या पराभवाचा कट रचला

मल्लिकार्जुन खर्गे : गुलबर्ग्यात भव्य स्वागत बंगळूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्ग्यामधून आपला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघाच्या नेत्यांनी रचलेला कट होता, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.माझ्या पराभवाला मतदारसंघाचे लोक किंवा मतदार जबाबदार नव्हते, परंतु मोदी, शहा आणि …

Read More »

कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?

संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये 15 टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहे असं कर्नाटक सरकार म्हणत आहे. सीमाभागात 60 तर 65 टक्के मराठी बांधव आहेत सीमाभागाच कानडीकरण केलं, मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याचे काम आणि कर्नाटक सरकारचा डाव …

Read More »

गांधी जयंती दिनी 225 जणांचे रक्तदान

रोटरी क्लब वेणूग्राम वतीने आयोजन बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज शनिवारी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या वतीने बेळगावातील महावीर भवन येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 225 जणांनी रक्तदान केले.इंडियन रेडक्रॉस सोसायटी, वेणूग्राम हॉस्पिटल, एलआयसी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, इनरव्हील क्लब, रोट्रेक्ट क्लब, बेळगाव …

Read More »

काॅलेज रोडचे नाव बदलून ‘त्यागवीर शिरसंगी लिंगराजू’ हे नवे नाव

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक संपताच नेहमी गजबजलेल्या काॅलेज रोडचे नाव बदलण्यात आले आहे. बेळगाव शहरातील काॅलेज रोडचे नाव बदलून त्या रोडला आता ‘त्यागवीर शिरसंगी लिंगराजू’ यांचे नाव दिले आहे. यावेळी खासदार मंगल अंगडी, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, बेळगाव जिल्हाधिकारी, महापालिकेच्या लक्ष्मी …

Read More »

शुभम शेळके यांनी घेतली शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट

बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना नेते राज्यसभा खासदार सामनाचे संपादक श्री संजय राऊत यांची मुंबई येथील सामना कार्यालयात भेट घेतली.युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमाप्रश्नी विविध विषयांवर व महानगर पालिका निवडणुकी बाबत चर्चा केली सोबतच सीमाभागातील युवकांच्या व मराठी भाषिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे पश्चिम विभागीय कार्यालयाचे स्थलांतर रोखण्यासाठी खा. अमोल कोल्हे यांनी पाठपुरावा करावा

बेळगाव : गेल्या 45 वर्षांपासून सुरु असणारे बेळगावमधील भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण पुढे करत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगावमधील कार्यालय पुन्हा स्थलांतरित करून चेन्नईला वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावसह चार राज्यातील व दोन केंद्रशासित प्रदेशातील भाषिक अल्पसंख्याक लोकांना कोणत्याही भाषिक अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी चेन्नईकडे …

Read More »

माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

बेळगाव (वार्ता) : माजी आमदार संजय पाटील मराठी माणसांवर पुन्हा एकदा घसरले आणि त्याविरोधात काँग्रेस पक्षाने त्यांच्या गोमटेश विद्यापीठाच्या समोर निदर्शने केली. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात संजय पाटील यांनी मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्याने संताप वाढला आहे. आज काँग्रेस पक्षाने …

Read More »

लिंगायत समाजाच्या आरक्षणावर निर्णय न झाल्यास उपोषण; जयमृत्यूंजय स्वामींचा इशारा

बंगळूरू : लिंगायत पंचमसाली समुदायाला ’2अ’ प्रवर्गात समाविष्ट न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुडलसंगम पंचमसाली मठाचे जयमृत्यूंजय स्वामीजी यांनी दिला. आज त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन लिंगायत आरक्षणावर प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री बोम्माई यांनी आपण ही बाब गांभिर्याने घेतली असल्याचे सांगून यावर निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ देण्याचे …

Read More »