Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

वृक्षतोडीच्या विरोधात वनाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे तोडण्यास सार्वजनिक आक्षेप घेण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन सहाय्यक वन संरक्षणाधिकार्‍यांना सादर करण्यात आले आहे. बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या …

Read More »

एअरमन ट्रेनिंग स्कूलने केले सुवर्ण विजय वर्ष साजरे

बेळगाव : बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे भारतीय सशस्त्र दलांनी 1971 सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या सभागृहात एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल …

Read More »

‘विजय ज्योती’चे लष्करी इतमामात स्वागत!

बेळगाव : पंतप्रधानांनी गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी अमर जवान ज्योतीने प्रज्वलित केलेल्या 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेल्या ‘विजय ज्योती’चे बेळगावची शान असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे हर्षोल्हासात लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. एमएलआयआरसी येथे विजय ज्योतीचे आगमन …

Read More »

पाठ्यपुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा

खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …

Read More »

पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत हटवावे

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्यविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा घालण्यात आला आहे त्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना आज मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी …

Read More »

समर्पण अभियानाअंतर्गत भाजपाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने सेवाही समर्पण या अभियानाअंतर्गत वीस दिवस वेगवेगळे सेवाकार्य सुरू आहेत. यानिमित्ताने उचगाव, सुळगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर प्रभाकर कोरे के.एल.ई. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य व किसान मोर्चा राज्याध्यक्ष श्री. इरण्णा कडाडी यांच्या …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात नांदगावचा युवक ठार

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी …

Read More »

श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर दर्शनासाठी खुले

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जागृत तसेच कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आराध्य दैवत असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथील श्री रेणुका (यल्लम्मा) देवी मंदिर आज मंगळवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.मागील वर्षभरापासून कोरोना काळात देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या इतिहासात प्रथमच भक्तांना 17 महिने देवीच्या दर्शनापासून वंचित …

Read More »

बेळगावच्या कन्येचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान

बेळगाव : बेळगावची सुकन्या डॉक्टर कु. नम्रता सुभाष देसाई ही कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे गेल्या जून 2020 पासून एमडी मेडिसिन हा कोर्स करित आहे. तिने निवासी डॉक्टर म्हणून केलेल्या कार्याचा गौरव भारताचे दळणवळण व रस्ते बांधणी मंत्री श्री. नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोना काळात कृष्णा …

Read More »

क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न

बेळगाव : क्लिक-वेणुग्रामतर्फे उत्कृष्ट गणपती मूर्ती आणि उत्कृष्ट देखावा व उत्कृष्ट संयोजन अशा पहिल्याच स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. देशा बाहेरचे व अंतर्गत शत्रू स्प्लीट-हिंदुस्थान म्हणजे देशाचे तुकडे करण्याच्या प्रयत्नात असतांना बेळगावच्या आठ युवा-मंडळीनी क्लिक-वेणुग्राम हा बेळगावसह देश जोडण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देऊन स्तुती करण्यात आली. …

Read More »