Tuesday , September 17 2024
Breaking News

महाराष्ट्र

पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील)  : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे यांनी पाहणी केली.यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश …

Read More »

माणगाव येयील महाविद्यालयीन युवकाचा लकिकट्टे तलावात बुडून मृत्यू

मृत सुरज चिंचणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील   महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे …

Read More »

तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. गुजरातच्या दिशेनं निघालेलं असणआरं अरबी समुद्रातील हे वादळ वाटेत आलेल्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करुन गेलं. ज्याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. अनेक घरं, मोठे वृक्ष आणि रस्त्यांची यामध्ये नासधूस झाली. त्यातच इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही …

Read More »

साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या 29 सदस्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांची नावे : डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, …

Read More »

ओलम अग्रो इंडियाकडून कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

ओलम कारखान्यामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देताना सोबत आमदार राजेश पाटील. तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम अग्रो इंडिया प्रा. लि. राजगोळीकडून खु. ता. चंदगड, या कारखान्यामार्फत चंदगड तालुक्याच्या कोरोना बाधित रूग्णांसाठी 10 लिटरची तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आली.ओलम साखर कारखाना आपत्ती काळात नेहमीच …

Read More »

८५ वर्षांच्या आजीने कोरोनाला केले चितपट!

संभाजी ब्रिगेडच्या गिरगाव कोव्हीड सेंटरमुळे रुग्णांमध्ये नवी ऊर्जाकालकुंद्री (वार्ताहर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण, नेते, खेळाडू, शरीरसौष्ठवपटू, पैलवान (घाबरून?) बळी पडत असताना एका ८५ वर्षांच्या आजीने या धोकादायक कोरोनाला चितपट केलंय. हे आश्चर्य घडलंय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोल्हापूर नजीकच्या गिरगाव- पाचगाव सेंटरमध्ये. कोल्हापूर शहरातील …

Read More »

लॉकडाउन शिथील झाल्याने कोवाड बाजारपेठेत गर्दी

कोवाड : जिल्ह्यातील लॉकडाउन रविवारी रात्री शिथील झाल्याने कोवाड बाजारपेठेत सोमवारपासून पुन्हा गर्दी उसळली आहे. लॉकडाउन काळात बंद असणारी दुकानेही खुली होत असल्याने लोकांची गर्दी होत आहे. ग्रामपंचायतीकडून नियमांचा भंग करणार्‍यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी बाजारपेठेत होणारी गर्दी चिंताजनक झाली आहे. प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. सकाळच्या …

Read More »

राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार?

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार …

Read More »

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात

कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला. …

Read More »