गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी पती निधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अंनिसने केला हलका. नाभिक समाजातील श्रीमती शांताबाई यादव वय वर्षे 72 रा.हसुरसासगिरी ता. गडहिंग्लज यांचे पती श्रीपती यादव यांचे 40 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि शांताबाई …
Read More »राजकीय जाहिरात प्रमाणिकरण, पेड न्यूज आणि फेक न्यूजबाबत माध्यम कक्षाची स्थापना
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून माध्यम कक्षाची पाहणी कोल्हापूर (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ 47 व 48 करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या कक्षामध्ये …
Read More »जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय बैठकांचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, आज, गुरुवारच्या बैठकीत जागावाटप सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीत सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचीही आज बैठक …
Read More »महायुतीत जागावाटपाचा पेच, तोडगा काढण्यासाठी नेते दिल्ली दरबारी, आतातरी तिढा सुटणार?
मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप …
Read More »एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय …
Read More »पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार
पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …
Read More »लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, 72 तासात 62 निर्णय
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागण्यासाठी कांही वेळ शिल्लक असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होत आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी देशभरात आचारसंहिता लागू होईल. यानंतर लोकसभा निवडणूक संपेपर्यंत …
Read More »तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा
लातूर : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या …
Read More »कालकुंद्रीत टस्कर हत्तीने केले दुचाकीचे नुकसान; हत्तीचा परतीचा प्रवास तेऊरवाडीच्या जंगलात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या २५ फेब्रुवारीपासून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागासह कर्नाटक सीमाभागात भ्रमंती करणारा टस्कर हत्ती आज पहाटे ४ वाजता थेट कालकुंद्री गावात शिरला. २५ फेब्रुवारी रोजी हाच हत्ती प्रथम कालकुंद्री येथेच ग्रामस्थांना दिसला होता. त्यानंतर १५ दिवसांनी आज सकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा गल्ली …
Read More »आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय
मुंबई : पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा (GR) धडाका पाहायला मिळत आहे. कारण दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळत आहे. या जीआरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय …
Read More »