Sunday , December 22 2024
Breaking News

मुख्य बातमी

देशात लसीकरणाचा विक्रम; बेळगावात उत्तम प्रतिसाद

दिवसभरात दिले दोन कोटी डोस नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही आहे. सध्या परिस्थिती हाताबाहेर नसली तरीही कोरोनाचं संकट केंव्हाही रौद्ररुप धारण करु शकतं. या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या या कार्यक्रमाअंतर्गत 77 कोटी …

Read More »

टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेषत: आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी …

Read More »

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘बॅड बँके’ची घोषणा!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडने (नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड एनएआरसीएल) थकीत कर्ज मालमत्ता अधिग्रहणासाठी जारी केलेल्या रोखे पावतीसाठी 30,600 कोटी रुपयांची केंद्र सरकारची हमी द्यायच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. गेल्या 6 आर्थिक वर्षांमध्ये बँकांना 5 लाख 1 हजार 479 कोटी रूपयांची रिकव्हरी …

Read More »

हिमाचलमध्ये दरड कोसळून 11 जण ठार, 30 बेपत्ता

किनौर : हिमाचल प्रदेशमधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 11 जण ठार झाले आहेत. तर 30 जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या …

Read More »

नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध!

टोक्यो : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. तब्बल तेरा वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 व दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करत विजयाची नांदी दिली. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर तर निरजचा चौथा प्रयत्न फाऊल …

Read More »

बजरंग पुनिया कांस्य पदकाचा मानकरी

टोकियो : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कझाकिस्तानच्या डाऊलेट नियाझबेकोव्हशी कांस्य पदकासाठी भिडला. त्याने सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत ८–० अशा गुण फरकाने कांस्य पदकावर नाव कोरले.बजरंगने पहिल्यापासून सामन्यावर पकड मिळवून दोन गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने चार गुणांचा कमाई करत आघाडी ६–० अशी नेली.सामन्यास काही सेकंद शिल्लक असताना त्याने …

Read More »

देशात लसीकरणाचा ५० कोटींचा टप्‍पा पार

नवी दिल्‍ली : कोरोना प्रतिबंधक लस हाच सध्‍या तरी कोरोनाविरुद्‍धच्‍या लढाईतील महत्‍वाचे अस्‍त्र आहे. देशात आता कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्‍यांचा आकडा ५० कोटी पार झाला आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, ५० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे ही अभिमानास्‍पद कामगिरी आहे. लसीकरण प्रक्रियेमधील सातत्‍य ठेवण्‍यासाठी …

Read More »

कर्नाटक एन्ट्रीसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह आवश्यक

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कर्नाटक सरकारने शनिवारी दुपारी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी शनिवारी दुपारपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमातपासणी …

Read More »

गुडबाय! बाबुल सुप्रियोंचा राजकारणातून संन्यास

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. एवढच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत, त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपाचे एक दिग्गज नेते होते. आता त्यांचा हा निर्णय भाजपासाठी …

Read More »

पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!

फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्‍या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …

Read More »