Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

महागाई दर 13 टक्क्यांवर; इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडले

नवी दिल्ली : इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील सर्वसाधारण महागाई दर (डब्ल्यूपीआय) 12.94 टक्क्यांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. कमी बेस इफेक्टमुळे देखील महागाई निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात हा निर्देशांक उणे 3.37 टक्के इतका होता. सलग पाचव्या महिन्यात महागाई निर्देशांकात वाढ …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात जून अखेरपर्यंत नवीन चेहऱ्यांना ​संधी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या सरकारला दोन वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहेत. पंरतु, आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार करण्यात आलेला नाही. कोरोना महारोगराईमुळे विस्ताराचा मुहूर्त टळत असल्याचे बोलले जात आहे. महारोगराईची दुसरी लाट आता ओसरत आहे, अशात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली …

Read More »

16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत …

Read More »

रोजगार वाढवा आणि दाढी तेवढी करा! पीएम मोदींना बारामतीच्या चहावाल्याने १०० रूपयांची मनी ऑर्डर पाठवली

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्‍यांच्या वाढवलेल्या दाढीमुळे सध्या जास्त चर्चेत आहेत. त्‍यातच आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण ठरलाय बारामतीचा एक चहावाला. या चहावाल्‍याने पंतप्रधान मोदी यांना दाढी करण्यासाठी चक्‍क १०० रूपयांची मनऑर्डर पाठवली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्‍यांच्या नव्या लुकमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. …

Read More »

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करा; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली.  यावेळी पंतप्रधान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन …

Read More »

पुणे : सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू

पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 20 मजूर अडकून पडले होते. यापैकी 18 जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान …

Read More »

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरूच

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, कडधान्य, खाद्य तेलाच्या देखील किंमती वाढल्या आहेत. जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आहे. अशा संकट काळात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल किंमतीत आजही वाढ केली आहे.तेलाच्या किंमतीत …

Read More »

कोरोना उपचारांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा  ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. कोराना रुग्णांना पूर्वी वाफ घ्यायचा सल्ला देण्यात येत होता. मात्र, आता …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु या ठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी …

Read More »

भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

कोलकाता : कोलकात्याच्या हेस्टिंग्ज क्रॉसिंग परिसरातील भाजप कार्यालयाजवळ 51 क्रूड बॉम्ब (देशी बॉम्ब) आढळून आले आहेत. हे सर्व बॉम्ब एका पोत्यामध्ये होते. याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब निकामी केले.या परिसरात बॉम्ब ठेवण्याचा उद्देश काय आहे, ते कोणी ठेवले, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. …

Read More »