Sunday , September 8 2024
Breaking News

मुख्य बातमी

राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ निश्चित?

तांत्रिक सल्लागार समितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल बंगळूरू : राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ बहूतेक निश्चित आहे. येत्या 13 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधात तांत्रिक सल्ला समितीने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना आपला अहवाल सादर केला आहे. अहवालामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या सात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतर …

Read More »

मॉन्सून लांबला!

पुणे : चार दिवसांपूर्वी अंदमानमध्ये जोरदार प्रवेशानंतर वेगाने भारताकडे कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वारे मंदावल्याने मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. सध्या या वाऱ्याला पुढे येण्यास पोषक स्थिती नसल्याने मान्सूनला खीळ बसली आहे. परिणामी १ जून रोजी केरळमध्ये येणारा मॉन्सून ३ जूनपर्यंत लांबणार आहे.अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर मोसमी वारे सक्रीय …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे. सतत …

Read More »

राहुल गांधींकडून देशातील जनतेचा अपमान : प्रकाश जावडेकर

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेसह कोरोनाचा मुकाबला करत आहेत. याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘नाटक’ असल्‍याचे संबोधित असून, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम डिसेंबर महिन्‍यापूर्वीच पूर्ण होईल, असे प्रत्त्‍युतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. भारतात …

Read More »

उत्तर प्रदेशमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने १३ जणांचा मृत्‍यू, १० जण गंभीर

अलीगड : येथे विषारी दारु पिल्‍याने १३ जणांचा मृत्‍यू झाला. १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यांच्‍यावर जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्‍यात आली आहे. देशी दारुची पाच दुकाने सील करण्‍यात आली आहेत, अशी माहिती स्‍थानिक प्रशासनाच्‍या सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्‍ह्यातील सर्व …

Read More »

निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार; मोदी सरकारचा निर्णय

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी …

Read More »

कर्नाटक: खासगी रुग्णालयांनी लसीकरण सेवा शुल्कात वाढ करण्याची केली मागणी

बेंगळूर : राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. शासनाच्या लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण सुरु असून खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारून लसीकरण केलं जात आहे. दरम्यान, कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात लसीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी मात्र लसीकरणाच्या सेवा शुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कोल्ड चेन, स्टोरेज आणि …

Read More »

सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमावलीमुळे लोकांनी घाबरू नये; केंद्रानं मांडली भूमिका

केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेल्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरकारच्या नियमामुळे गोपनीयतेचा भंग होईल, असा दावा व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपचा हा दावा केंद्र सरकारने बुधवारी फेटाळला. या नियमामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेली नियमावली सोशल …

Read More »

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आकांक्षा’ पोर्टलचे अनावरण

बेंगळूर : कर्नाटकच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडक ग्रामपंचायतींसह अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यांनतर कोरोना संकटात योगदान देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक सोपा व्हावा यासाठी नियोजन खात्याने ‘आकांक्षा’ पोर्टल सुरु केले आहे. बुधवारी मुख्यमंत्री बी. …

Read More »

कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन

बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा …

Read More »