Tuesday , July 21 2026
Breaking News

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

Spread the love

नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे.

सतत होणाऱ्या पेट्रोल दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (शनिवार) पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यापासून मे महिन्यात १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान मागच्या १६ दिवसांत एकही दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात एकदाही कपात झाली नाही.

About Belgaum Varta

Check Also

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Spread the love  व्हिएतनाम : पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. व्हिएतनाममधील फु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *