खानापूर : तालुका म. ए. समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे …
Read More »मोदेकोप गावच्या पाणी समस्येची आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घेतली दखल
खानापूर (प्रतिनिधी) : मोदेकोप (ता. खानापूर) गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मोदेकोप गावच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या महिलाना व नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मोदेकोप गावात केवळ एकाच कूपनलिकेवर संपूर्ण गावाला विसंबून राहावे लागत असल्याने केवळ कूपनलिके व्यतिरिक्त कोणते स्वच्छ पाणी मिळत नाही. असे …
Read More »खानापूरचे अभिजीत कालेकर राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित
खानापूर : खानापूर तालुक्यात पुरातन लोककलांना जागृती देत एक उत्तम कलावंत तसेच कलाकुसरतेचा अभ्यासक लोककलावंत अभिजीत द. कालेकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 ने 22 जून रोजी छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले. अभिजीत कालेकर हे एक खानापूर तालुक्यातील उत्तम …
Read More »खानापूर आंबेडकर भवनाचा मुद्दा परिशिष्ट जाती जमातीच्या बैठकीत गाजला
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील आंबेडकर भवन उभारणीसाठी परिशिष्ट जाती, जमातीच्या नागरिकांकडून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खानापूर तालुका अधिकाऱ्यांकडून गेल्या चार वर्षांत याची कोणतीच हालचाल झाली नाही, अशी तक्रार राजू खातेदार यांनी गुरूवारी दि. २२ रोजी रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात आयोजित परिशिष्ट जाती, जमातीच्या बैठकीत …
Read More »अस्वलाच्या हल्ल्यात जखमी चंदगडचा इसम जखमी
रामनगर : चंदगड तालुक्यातील एक इसम रामनगर नजीक आपले नातेवाईकाच्या घरी तिंबोली येथे पायी चालत जात असताना रायशेत दरम्यान अचानक अस्वलाने हल्ला केल्याने एक इसम गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. जखमी झालेल्या इसमाचे नाव विष्णू तानाजी शेळके वय 72 राहणार मावळणगी, चंदगड जिल्हा कोल्हापूर असे आहे. याबाबत मिळालेली …
Read More »खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित खानापूर-बेळगाव, रामनगर, हलियाळ, अळणावर व तत्सम भागातील पुणेस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थी- पालक मार्गदर्शन मेळावा नुकताच येथील सुवासिनी मंगल कार्यालय, वडगांव बुद्रुक, पुणे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विश्वास उद्योग समूहाचे संस्थापक …
Read More »मलप्रभा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
खानापूर : मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ‘ त्या ‘ अनोळखी महिलेचा आज मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वी म्हणजेच मागील मंगळवारी रात्रीच्या सुमारास खानापूर मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या अनोळखी महिलेने केला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही युवकांनी त्या वृद्धेला …
Read More »जांबोटी येथे शालेय विद्यार्थीनींसाठी कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : टीम केअर फॉर यू आणि लोक कल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालय, जांबोटी येथे इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींसाठी ‘मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य महेश सडेकर, शीतल भंडारी, गौरी गजबार, निशिगंधा कानूरकर, संतोष कदम यांच्या हस्ते …
Read More »लष्करातील मेजरही निघाला बनावट; जाळ्यात अडकला खानापूरातील बनावट मेजर
पुणे : विविध विभागात उच्च पदावर अधिकारी असल्याचा दावा करणारे अनेक बनावट अधिकारी सध्या उजडेत येत आहेत. आता पुण्यात बनावट मेजर सापडला आहे. पुण्यातून खानापूरातील बनावट मेजरला ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. चिखली येथे सापळा रचत …
Read More »खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचे आरक्षण जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta