Saturday , June 6 2026
Breaking News

मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन शाळेतूनच; आबासाहेब दळवी

Spread the love

 

खानापूर : मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे काम शाळांमधून होते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिक्षकानी आपले कर्तव्य समजून मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील सरकारी मराठी मुलांची व मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बी. व्ही. कुंभार होत्या. प्रारंभी शाळेचे सहशिक्षक जे. पी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळेसमोर आज अनेक संकटे निर्माण झाली आहेत. त्यामुळे शिक्षकांची भूमिका येणाऱ्या काळात महत्त्वाची ठरणार असून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यामुळे खाजगी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले तरच विद्यार्थ्यांचा विकास होतो हा संभ्रम विद्यार्थ्यांनी दूर करून घेणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समितीतर्फे विविध गावात जाऊन जनजागृतीचे काम हाती घेतले जाईल, असे मत व्यक्त केले.
खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी खानापूर आणि परिसरातील अनेक गावे मराठी बहुल आहेत. त्यामुळे या गावातील मराठी शाळांसाठी प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे असून युवा समितीतर्फे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात आहे. त्या उपक्रमाचे कौतुक करावे तितके कमी असून येणाऱ्या काळात खानापूर तालुक्यातून देखील युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाला मदत केली जाईल अशी माहिती दिली.
मिलिंद देसाई यांनी कर्नाटकी सरकारकडून मराठी शाळा सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे अनेक शाळेंसमोर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक गावातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. युवा समितीतर्फे गेल्या काही वर्षांपासून यासाठीच प्रयत्न करीत आहे, असे मत व्यक्त केले.
सरकारी मराठी मुलांची व मुलींच्या शाळेला शैक्षणिक साहित्य विचार करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्या बाबत शाळेतर्फे युवा समितीचे आभार मानण्यात आले. यावेळी सहशिक्षक टी. बी. मोरे, आर. एम. लोहार, जे. बी. होसुर, के. एस. पिंगट, एम. सी. वाली आदि शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *